२१ मार्च हा जागतिक कविता दिन आहे. म्हणून एखादी ताजी कविता आपणही टाकू म्हटलं.
म्हटलेच होते...
होय दगडाला ह्रदय म्हटलेच होते
नाइलाजाला सवय म्हटलेच होते
धीर देती ते जणु हरलो पुरा मी
मीहि हरण्याला विजय म्हटलेच होते
एक मिटते वाट अन खुलतेही एक
प्रीतिच्या अस्ता उदय म्हटलेच होते
वाटली होतीच भीती या क्षणाची
मी मनाला 'हो अभय' म्हटलेच होते
वाहुनी गेलो कधी नकळे अपूर्व
आसवांना मी प्रलय म्हटलेच होते
- अपूर्व ओक
२०-३-१७
काव्यरस
वाचने
4639
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख !!
आवडली
_/\_
सुन्दरच
सगळ्यात शेवटी तुझं नाव येतं
धन्यवाद
In reply to सगळ्यात शेवटी तुझं नाव येतं by स्रुजा
छान
वाह्...
होय दगडाला ह्रदय म्हटलेच होते
मस्त!
शार्दुल, समाधान, निनाव, पैतै,
अपूर्व गझल ....
धन्यवाद चौ.रा.काका
In reply to अपूर्व गझल .... by चौकटराजा
सुरेख गझल ! राग येणार नसेल
बरोबर आहे. पुढील वेळी नक्की
In reply to सुरेख गझल ! राग येणार नसेल by विशाल कुलकर्णी
मी मनाला 'हो अभय' म्हटलेच
अगदी अगदी :P
In reply to मी मनाला 'हो अभय' म्हटलेच by सूड
हाहाहा. नाही रे बाबा.
In reply to मी मनाला 'हो अभय' म्हटलेच by सूड