आज पहाटेच कोसळला
एक जुनाट निर्मनुष्य वाडा
अन त्याला साथ देणारा
चिमणीपाखरांचा खोपा
नजर आपसूक शोध घेऊ लागली
हरवलेल्या अस्तित्वाचा
पण तुटक्या घराच्या काही काटक्याच फक्त
उडत होत्या स्मशानराखेसारख्या.
बुल्डोजरच्या कोलाहलात हरवलेले
उमलत्या चोचींतले कोवळे स्वर
ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली
चिवचिवणारी अखेरची धडपड
मनात चर्र झालं
पण…
शहाण्या माणसाकडून तिला
एवढंतरी बाळकडू मिळालं
पिलांना घेऊन चिमणी उडाल्याचं
मला मागाहून कळालं.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2754
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
ग्रेट!!!
व्वा, सुंदर शेवट
आहा..सुरेख!
व्वाह!
हुश्श!
फारच सुंदर!
छान !
सुरेख!
:)