तुझ्या ऊन्हाचं कौतुक..
लेखनविषय:
काव्यरस
तुझ्या ऊन्हाचं कौतुक
किती करावं करावं
माप पदरी सुखाचं
किती भरावं भरावं
बघ तुळशीला आल्या
मखमालीच्या मंजिर्या
चिऊताईच्या दातांनी
किती खुडावं खुडावं
खिडकीच्या गजावर
झुले डांगराचा वेल
बोटभर आधारानं
वर चढावं चढावं
नंदी बसलेला दारी
गळी लेणं घुंगराचं
येताजाता भक्तीभावे
तिथं नमावं नमावं
झुल्यावर लेकरांची
किलबिल चारीठाव
सांज सरता सयेने
पाय वळावं वळावं
पुण्य कुठल्या जन्माचं
आज फळुनिया आलं
भरलेल्या गोकुळात
दिस सरावं सरावं
वाचने
11439
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
अप्रतिम सुरेख रचना!
छान आहे कविता. आवडली.
कविता आवडली मस्तच आहे, तुमच्या बनलेही असते राधा, मज कृष्ण भेटला नाही .. अतूट काही... आणि आताची हि कविता स्त्रीत्वातील भारतीयता दाखवते. नको वाटते.. या कवितेतील स्त्री मागत असलेला 'खुला पैलतीर' कवितेची पार्श्वभूमी नाही सांगितली तर स्त्री मुक्ततावादी वाटेल पण कवितेतील 'खुला पैलतीर' अर्थ पारंपारीक भारतीय संकल्पनेतील मुक्ति मागणारा वाटतो.
प्राची अश्विनी यांच्या कविता स्त्रीयांच्या नवीन पिढी पेक्षा एखाद पिढी आधीच्या स्त्रीची भावना रेखाटतात की भारतीय स्त्रीयांची नवी पिढीही या कवितांप्रमाणे विचार करते असा एक प्रश्न सहजच मनात येऊन गेला.
In reply to कविता आवडली मस्तच आहे, by माहितगार
किंवा नवीन पिढीतील स्त्रीला या कवितेतील भावनांशी नाळ जुळवणे कितपत जमू शकेल ?
In reply to किंवा नवीन पिढीतील स्त्रीला by माहितगार
धन्यवाद. पण बापरे , असा विचार केला नव्हता. कदाचित तुमचं म्हणणं बरोबरही असेल.
सुन्दर रचना ! फक्त " किलबिल" च्या जोडीला "चारीठाव" हा शब्द (जो चौरस व पोटभर जेवणाच्या सन्दर्भात वापरतात) थोडा खटकला.
In reply to सुन्दर रचना ! by अनन्त्_यात्री
ओह्! बरं झालं सांगितलंत ते. मी सतत असं समजत होते. आता बदलते.:)
In reply to ओह्! बरं झालं सांगितलंत ते. by प्राची अश्विनी
अप्रतिम कविता आहे, मी चारीठाव म्हणजे सगळीकडे, चार दिशांना असं समजत होते.
In reply to सुन्दर रचना ! by अनन्त्_यात्री
चारीठाव सर्वसाधारण पणे आहाराच्या संदर्भाने वापरला जात असला तरी 'चारीठाव' म्हणजे दिवसातून चार वेळा खाणे अशा अर्थाने येतो का ? म्हणजे चारीठाव या शब्दाचा मूळ अर्थ दिवसाच्या चार वेळा असा असावा असे आता पर्यंत समजत आलो होतो. ऑनलाईन डिक्शनर्यांमध्ये हा शब्द मिळाला नाही कुणि छापील शब्दकोशातून सांगू शकेल का ?
In reply to चारीठाव सर्वसाधारण पणे by माहितगार
गूगलले असता चारीठाव हा शब्द चारवेळा, चार दिशा, चौरस आहार, असाही वापरात येऊ लागल्याचे दिसते आहे. मोल्सवर्थातली नोंद मात्र 'चार ही ठाव' (Even the four, the very four, the main or preeminent four, dishes,--भात, भाजी, वरण, पोळी) A term for a decent, comfortable, or respectably-furnished feast or meal:--as disting. from घड्याळ टिपरूं &c. A poor meal--mere bread and a chili.
अशी मिळाली
संदर्भ
भरलेल्या गोकुळाचे सुरेख वर्णन, आवडले!
Sandy
कविता आवडल्या गेली आहे
मससससससस्त!
छान आहे खूप.
छान. कविता आवडली.
फार उत्तम
फार उत्तम
सर्वांना धन्यवाद!!
किती सुंदर!
डांगराचा वेल म्हणजे काय?
In reply to किती सुंदर! by पिशी अबोली
अग, डांगर म्हणजे भोपळा.
साधी, सरळ, सोपी पण तितकीच आशयगर्भ! अतिशय सुंदर! :-)
In reply to साधी, सरळ, सोपी पण तितकीच by राघव
__/\__
फार सुंदर कविता प्राची!
सुंदर
सुंदर कविता !!!
फार सुंदर आहे सगळं. पण हे कुठेतरी हरवत चाललय हे ही खरे.
बाकी माहितगार - होय, लिहिताना नव्याची उत्सुकता उमटते, पण जुने लोभसवाणे खुणावत राहते.
सुंदर कविता!
मस्तच.....!
__/\__
अतिशय सुरेख चित्रदर्शी कविता.
In reply to अतिशय सुरेख चित्रदर्शी कविता. by पद्मावति
+१.. असंच म्हणते.. सुरेख कविता!!
बहिणाबाईंच्या ओव्या आठवतात.
सुरेख !
In reply to अशा साध्या, सरळ, सोप्या कविता वाचल्या की by संजय क्षीरसागर
हे एकदम बरोबर आहे
झुल्यावर लेकरांची
किलबिल चारीठाव
सांज सरता सयेने
पाय वळावं वळावं
चारीठाव म्हणजे सतत असा अर्थ होतो.मस्त मस्त मस्त. बहिणाईंची आठवण झाली.
असं काही वाचल्यावर मग त्यावर आणखी काही नकोच असे वाटते..
फार सुरेख!
प्रत्येक स्त्रीचं स्वप्न ... कदाचित पुरुषांचंही.
In reply to सुन्दर कविता by इरामयी
:) धन्यवाद!
वा!