तुझ्या ऊन्हाचं कौतुक..
तुझ्या ऊन्हाचं कौतुक
किती करावं करावं
माप पदरी सुखाचं
किती भरावं भरावं
बघ तुळशीला आल्या
मखमालीच्या मंजिर्या
चिऊताईच्या दातांनी
किती खुडावं खुडावं
खिडकीच्या गजावर
झुले डांगराचा वेल
बोटभर आधारानं
वर चढावं चढावं
नंदी बसलेला दारी
गळी लेणं घुंगराचं
येताजाता भक्तीभावे
तिथं नमावं नमावं
झुल्यावर लेकरांची
किलबिल चारीठाव
सांज सरता सयेने
पाय वळावं वळावं
पुण्य कुठल्या जन्माचं
आज फळुनिया आलं
भरलेल्या गोकुळात
दिस सरावं सरावं
वा!
छान आहे कविता. आवडली.
कविता आवडली मस्तच आहे,
किंवा नवीन पिढीतील स्त्रीला
धन्यवाद. पण बापरे , असा विचार
सुन्दर रचना !
ओह्! बरं झालं सांगितलंत ते.
अप्रतिम
चारीठाव सर्वसाधारण पणे
गूगलले असता चारीठाव हा शब्द
सुंदर!
कविता आवडल्या गेली आहे
मससससससस्त!
छान आहे खूप.
छान. कविता आवडली.
फार उत्तम
फार उत्तम
सर्वांना धन्यवाद!!
किती सुंदर!
अग, डांगर म्हणजे भोपळा.
साधी, सरळ, सोपी पण तितकीच
__/\__
फार सुंदर कविता प्राची!
सुंदर
सुंदर कविता !!!
फार सुंदर आहे सगळं. पण हे
सुंदर कविता!
मस्तच.....!
__/\__
अतिशय सुरेख चित्रदर्शी कविता.
+१.. असंच म्हणते.. सुरेख
अशा साध्या, सरळ, सोप्या कविता वाचल्या की
बाय द वे,
झुल्यावर लेकरांची किलबिल चारीठाव सांज सरता सयेने पाय वळावं वळावंचारीठाव म्हणजे सतत असा अर्थ होतो.मस्त मस्त मस्त. बहिणाईंची
फार सुरेख!
सुन्दर कविता
:) धन्यवाद!