मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(आम्हां न कळे नज़्म)

स्वामी संकेतानंद · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आम्हां नकळे नज़्म, नकळेच शेर। गझली बहर, नकळे आम्हां।। काफिया की आधी, रदिफ म्हणावा। मतला जुळावा नकळे आम्हां।। कधी म्हणे सूट, कधी अपवाद। शायरांचे वाद नकळे आम्हां।। वज्न,रुक्न, जुज; लाम, गाफ आणि। नकळेची वाणी गझलेची।। स्वाम्या म्हणे माज मोकार करावा। रतीब घालावा गझलांचा।। - स्वामी संकेतानंद

वाचने 2662 वाचनखूण प्रतिक्रिया 6

खेडूत 13/12/2016 - 10:57
वा! मोक्कार आवडले काव्य. रतीबाच्या प्रतिक्षेत..!

In reply to by पैसा

अत्रुप्त आत्मा 14/12/2016 - 06:07
+१ स्वामिज्जी दुत्त दुत्त आहेत! स्वामिज्जी की म-हा... न रचनांए|