Skip to main content

(आम्हां न कळे नज़्म)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी मंगळवार, 13/12/2016 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हां नकळे नज़्म, नकळेच शेर। गझली बहर, नकळे आम्हां।। काफिया की आधी, रदिफ म्हणावा। मतला जुळावा नकळे आम्हां।। कधी म्हणे सूट, कधी अपवाद। शायरांचे वाद नकळे आम्हां।। वज्न,रुक्न, जुज; लाम, गाफ आणि। नकळेची वाणी गझलेची।। स्वाम्या म्हणे माज मोकार करावा। रतीब घालावा गझलांचा।। - स्वामी संकेतानंद
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2665
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

वा! मोक्कार आवडले काव्य. रतीबाच्या प्रतिक्षेत..!

In reply to by पैसा

+१ स्वामिज्जी दुत्त दुत्त आहेत! स्वामिज्जी की म-हा... न रचनांए|