आम्हां नकळे नज़्म, नकळेच शेर।
गझली बहर, नकळे आम्हां।।
काफिया की आधी, रदिफ म्हणावा।
मतला जुळावा नकळे आम्हां।।
कधी म्हणे सूट, कधी अपवाद।
शायरांचे वाद नकळे आम्हां।।
वज्न,रुक्न, जुज; लाम, गाफ आणि।
नकळेची वाणी गझलेची।।
स्वाम्या म्हणे माज मोकार करावा।
रतीब घालावा गझलांचा।।
- स्वामी संकेतानंद
काव्यरस
वाचने
2679
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!
वा!
मोक्कार आवडले काव्य.
रतीबाच्या प्रतिक्षेत..!
हाय कंबख़्त, तूने पी हि नहीं!
हाय कंबख़्त, तूने पी हि नहीं!!!
कस्ला आहेस रे तू!
कस्ला आहेस रे तू! बर्याच जणांची दुकाने बंद करशील अशाने!
+१
In reply to कस्ला आहेस रे तू! by पैसा
+१
स्वामिज्जी दुत्त दुत्त आहेत!
स्वामिज्जी की म-हा... न रचनांए|
मस्त !
आवड्ली!
वाह... क्या बात है !
लाजवाब हो.....