आम्हां नकळे नज़्म, नकळेच शेर।
गझली बहर, नकळे आम्हां।।
काफिया की आधी, रदिफ म्हणावा।
मतला जुळावा नकळे आम्हां।।
कधी म्हणे सूट, कधी अपवाद।
शायरांचे वाद नकळे आम्हां।।
वज्न,रुक्न, जुज; लाम, गाफ आणि।
नकळेची वाणी गझलेची।।
स्वाम्या म्हणे माज मोकार करावा।
रतीब घालावा गझलांचा।।
- स्वामी संकेतानंद
काव्यरस
वाचने
2665
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!
हाय कंबख़्त, तूने पी हि नहीं!
कस्ला आहेस रे तू!
+१
In reply to कस्ला आहेस रे तू! by पैसा
मस्त !
वाह... क्या बात है !