एकांत
काव्यरस
काय लिहावं?
काय वाचावं?
काय आठवावं?
काय गुणगुणावं ?
चंद्र, तारे, फुलं नि पक्ष्यांना
बळेच एकत्र मांडावं
नेमकं त्याच कडव्यावर
का मनानं सांडावं?
आजच्या बंडखोर लेखकानं
कालच्याला भांडावं!
दोघांचही चुकत नसतं
कुणाला समोर ठेवावं?
तिन्हीसांजेची वेळ समोर
अन एकांतानं घेरावं
कितीही नको म्हटलं तरी
का आठवणींनी आठवावं?
शीळ येते मुक्कामी
शब्दांनी का रुसावं?
सुस्कारे नि हुंकार याला
गुणगुणनं कसं म्हणावं
काय लिहावं?
काय वाचावं?
काय आठवावं?
काय गुणगुणावं ?
- संदीप चांदणे
वाचने
2824
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
छान !
चंद्र, तारे, फुलं नि पक्ष्यांना
बळेच एकत्र मांडावं :)))) - कधी कधी काही सुचला नाही कि याच सारखी मनस्थिती होते
ओहोहोहो,
मस्तच सॅन्डीबाबा.
बळंच नकोच काहीच. :)
कविता फार आवडली पण तिसरं कडवं जरासं उपरं वाटलं.
आजच्या बंडखोर लेखकानं कालच्याला भांडावं!हे जास्ती पटलं. पट्टीतला नाखु
तिन्हीसांजेची वेळ समोर अन एकांतानं घेरावं कितीही नको म्हटलं तरी का आठवणींनी आठवावं?हे अगदी भिडले !
सँडीबुवा , लय दिसांनी दिसला !!!
वेलकम बॅक म्हणावं काय !
कविता एकदम तुमच्या पट्टीतली!!
आंदो!
सुरेख
मस्त ! साध्यासरळ नेमक्या भावना !
छान !