काय लिहावं?
काय वाचावं?
काय आठवावं?
काय गुणगुणावं ?
चंद्र, तारे, फुलं नि पक्ष्यांना
बळेच एकत्र मांडावं
नेमकं त्याच कडव्यावर
का मनानं सांडावं?
आजच्या बंडखोर लेखकानं
कालच्याला भांडावं!
दोघांचही चुकत नसतं
कुणाला समोर ठेवावं?
तिन्हीसांजेची वेळ समोर
अन एकांतानं घेरावं
कितीही नको म्हटलं तरी
का आठवणींनी आठवावं?
शीळ येते मुक्कामी
शब्दांनी का रुसावं?
सुस्कारे नि हुंकार याला
गुणगुणनं कसं म्हणावं
काय लिहावं?
काय वाचावं?
काय आठवावं?
काय गुणगुणावं ?
- संदीप चांदणे
काव्यरस
वाचने
2828
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान !
ओहोहोहो,
कविता फार आवडली पण तिसरं कडवं
आवडली
मस्तच !
सँडीबुवा , लय दिसांनी दिसला !
सुरेख
+1
In reply to सुरेख by प्रचेतस
मस्त ! साध्यासरळ नेमक्या