Skip to main content

एकांत

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 14/10/2016 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
काय लिहावं? काय वाचावं? काय आठवावं? काय गुणगुणावं ? चंद्र, तारे, फुलं नि पक्ष्यांना बळेच एकत्र मांडावं नेमकं त्याच कडव्यावर का मनानं सांडावं? आजच्या बंडखोर लेखकानं कालच्याला भांडावं! दोघांचही चुकत नसतं कुणाला समोर ठेवावं? तिन्हीसांजेची वेळ समोर अन एकांतानं घेरावं कितीही नको म्हटलं तरी का आठवणींनी आठवावं? शीळ येते मुक्कामी शब्दांनी का रुसावं? सुस्कारे नि हुंकार याला गुणगुणनं कसं म्हणावं काय लिहावं? काय वाचावं? काय आठवावं? काय गुणगुणावं ? - संदीप चांदणे
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2828
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

छान ! चंद्र, तारे, फुलं नि पक्ष्यांना बळेच एकत्र मांडावं :)))) - कधी कधी काही सुचला नाही कि याच सारखी मनस्थिती होते

ओहोहोहो, मस्तच सॅन्डीबाबा. बळंच नकोच काहीच. :)

आजच्या बंडखोर लेखकानं कालच्याला भांडावं!
हे जास्ती पटलं. पट्टीतला नाखु

तिन्हीसांजेची वेळ समोर अन एकांतानं घेरावं कितीही नको म्हटलं तरी का आठवणींनी आठवावं?
हे अगदी भिडले !

In reply to by प्रचेतस

कविता आवडली!