✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

..आयुष्याला मी सौख्याचा बाजार म्हणालो..

क — कानडाऊ योगेशु, गुरुवार, 05/26/2016 - 07:12
आयुष्याला मी सौख्याचा बाजार म्हणालो. अन दु:खाला जगण्याचा अधीभार म्हणालो हाताने ती भरवीत होती घास कुणाला . तेव्हा मज तू दिसलीस सुंदर फार म्हणालो. तिने ठेवले खांद्यावर मस्तक विश्वासाने साधा भोळा हा आपला शृंगार म्हणालो. किती वेदना दाराजवळि दिसल्या घुटमळताना होईल तुमचा छान इथे उपचार म्हणालो. दु:ख म्हणाले निघताना "मज बरे वाटते" गायब केला जुना तूझा आजार म्हणालो. बदनामी जर यदाकदाचीत सत्य निघाली. होईल माझा नक्की जयजयकार म्हणालो. नियती देखील शस्त्र त्यागुनि हसुन परतली दिसशी तू तर चतूर देखणी नार म्हणालो स्वागत केले इथे तसेही सुमनांचे पण काट्यांनाही मी माझा परीवार म्हणालो.. शत्रू येता कवटाळूनी मी त्याला तेव्हा.. मित्रा तू तर नवाच माझा यार म्हणालो.. मेघ गर्जवत संकट येता दाहीदिशांनी होईल आता नक्की मुसळाधार म्हणालो. नशीब येता घेऊन माझी हार कधी जर.. हार नव्हे हि,हा तर माझा सत्कार म्हणालो पडलो उठलो रडलो हसलो इथे कितिदा! निघतानाही आयुष्यास आभार म्हणालो.. ------ कानडाऊ योगेशु

प्रतिक्रिया द्या
2951 वाचन

💬 प्रतिसाद (17)

सुरेख!

प्राची अश्विनी
गुरुवार, 05/26/2016 - 07:33 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

धन्यवाद प्राचीतै!

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 05/26/2016 - 10:34 नवीन
धन्यवाद प्राचीतै!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

मीटर गंडतंय जाम. बाकी भाव

वेल्लाभट
गुरुवार, 05/26/2016 - 10:45 नवीन
मीटर गंडतंय जाम. बाकी भाव आवडले. ते उत्तम पकडतोस तू.
  • Log in or register to post comments

वेल्लाभट,

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 05/26/2016 - 12:13 नवीन
वेल्लाभट, मात्रावृत्तात लिहायचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक ओळीत २५ मात्रा आहेत.!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

हो...तसं जाणवलं पण गेयता कमी

वेल्लाभट
गुरुवार, 05/26/2016 - 12:15 नवीन
हो...तसं जाणवलं पण गेयता कमी वाटली. बघतो पुन्हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

अ प्र ति म ! अतिशय सुंदर

चौथा कोनाडा
गुरुवार, 05/26/2016 - 13:37 नवीन
अ प्र ति म ! अतिशय सुंदर रचना ! वाह, क्या बात कायो ! हाताने ती भरवीत होती घास कुणाला तेव्हा मज तू दिसलीस सुंदर फार म्हणालो. मस्तच !
  • Log in or register to post comments

धन्यवाद चौ.को!

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 05/26/2016 - 15:50 नवीन
धन्यवाद चौ.को!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

1+

बाबा योगिराज
गुरुवार, 05/26/2016 - 17:14 नवीन
कायो, मानरे नै मियां. मस्त भेष्ट आवड्यास.
  • Log in or register to post comments

सुरेख!

रातराणी
गुरुवार, 05/26/2016 - 23:48 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

सुंदर रचना!

शिव कन्या
Sat, 05/28/2016 - 11:24 नवीन
सुंदर रचना! पडलो उठलो रडलो हसलो इथे कितिदा! निघतानाही आयुष्यास आभार म्हणालो.. खरे!
  • Log in or register to post comments

बरबादियों का जशन मनाता चला

चलत मुसाफिर
Wed, 06/08/2016 - 23:22 नवीन
बरबादियों का जशन मनाता चला गया...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 05/28/2016 - 12:58 नवीन
आवडली गझल. लिहित राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

धन्यवाद बाबा योगिराज,रातराणी

कानडाऊ योगेशु
Sat, 05/28/2016 - 14:17 नवीन
धन्यवाद बाबा योगिराज,रातराणी,शिवकन्या आणि बिरूटेसर!
  • Log in or register to post comments

मस्त

अश्विनी वैद्य
Sat, 05/28/2016 - 15:05 नवीन
खूपच छान....!
  • Log in or register to post comments

वा! काय कल्पना!! आवडली.

चलत मुसाफिर
Wed, 06/08/2016 - 23:21 नवीन
"नियती देखील शस्त्र त्यागुनि हसुन परतली दिसशी तू तर चतुर देखणी नार म्हणालो" आम्हीही म्हणून पाहिले. पण नियती कानफटवून तरातरा पुढे गेली.
  • Log in or register to post comments

मीटरमध्ये

चलत मुसाफिर
Wed, 06/08/2016 - 23:34 नवीन
दिसता दारावरी वेदना घुटमळताना 'होइल तुमचा छान इथे उपचार' म्हणालो.
  • Log in or register to post comments

योग्य बदल आहे च.मु साहेब.

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 06/09/2016 - 21:40 नवीन
योग्य बदल आहे च.मु साहेब. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा