Skip to main content

..आयुष्याला मी सौख्याचा बाजार म्हणालो..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी गुरुवार, 26/05/2016 07:12 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याला मी सौख्याचा बाजार म्हणालो. अन दु:खाला जगण्याचा अधीभार म्हणालो हाताने ती भरवीत होती घास कुणाला . तेव्हा मज तू दिसलीस सुंदर फार म्हणालो. तिने ठेवले खांद्यावर मस्तक विश्वासाने साधा भोळा हा आपला शृंगार म्हणालो. किती वेदना दाराजवळि दिसल्या घुटमळताना होईल तुमचा छान इथे उपचार म्हणालो. दु:ख म्हणाले निघताना "मज बरे वाटते" गायब केला जुना तूझा आजार म्हणालो. बदनामी जर यदाकदाचीत सत्य निघाली. होईल माझा नक्की जयजयकार म्हणालो. नियती देखील शस्त्र त्यागुनि हसुन परतली दिसशी तू तर चतूर देखणी नार म्हणालो स्वागत केले इथे तसेही सुमनांचे पण काट्यांनाही मी माझा परीवार म्हणालो.. शत्रू येता कवटाळूनी मी त्याला तेव्हा.. मित्रा तू तर नवाच माझा यार म्हणालो.. मेघ गर्जवत संकट येता दाहीदिशांनी होईल आता नक्की मुसळाधार म्हणालो. नशीब येता घेऊन माझी हार कधी जर.. हार नव्हे हि,हा तर माझा सत्कार म्हणालो पडलो उठलो रडलो हसलो इथे कितिदा! निघतानाही आयुष्यास आभार म्हणालो.. ------ कानडाऊ योगेशु
लेखनविषय:

वाचने 2968
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

सुरेख!

अ प्र ति म ! अतिशय सुंदर रचना ! वाह, क्या बात कायो ! हाताने ती भरवीत होती घास कुणाला तेव्हा मज तू दिसलीस सुंदर फार म्हणालो. मस्तच !

कायो, मानरे नै मियां. मस्त भेष्ट आवड्यास.

सुंदर रचना! पडलो उठलो रडलो हसलो इथे कितिदा! निघतानाही आयुष्यास आभार म्हणालो.. खरे!

आवडली गझल. लिहित राहा. -दिलीप बिरुटे

खूपच छान....!

"नियती देखील शस्त्र त्यागुनि हसुन परतली दिसशी तू तर चतुर देखणी नार म्हणालो" आम्हीही म्हणून पाहिले. पण नियती कानफटवून तरातरा पुढे गेली.

दिसता दारावरी वेदना घुटमळताना 'होइल तुमचा छान इथे उपचार' म्हणालो.