..आयुष्याला मी सौख्याचा बाजार म्हणालो..
आयुष्याला मी सौख्याचा बाजार म्हणालो.
अन दु:खाला जगण्याचा अधीभार म्हणालो
हाताने ती भरवीत होती घास कुणाला .
तेव्हा मज तू दिसलीस सुंदर फार म्हणालो.
तिने ठेवले खांद्यावर मस्तक विश्वासाने
साधा भोळा हा आपला शृंगार म्हणालो.
किती वेदना दाराजवळि दिसल्या घुटमळताना
होईल तुमचा छान इथे उपचार म्हणालो.
दु:ख म्हणाले निघताना "मज बरे वाटते"
गायब केला जुना तूझा आजार म्हणालो.
बदनामी जर यदाकदाचीत सत्य निघाली.
होईल माझा नक्की जयजयकार म्हणालो.
नियती देखील शस्त्र त्यागुनि हसुन परतली
दिसशी तू तर चतूर देखणी नार म्हणालो
स्वागत केले इथे तसेही सुमनांचे पण
काट्यांनाही मी माझा परीवार म्हणालो..
शत्रू येता कवटाळूनी मी त्याला तेव्हा..
मित्रा तू तर नवाच माझा यार म्हणालो..
मेघ गर्जवत संकट येता दाहीदिशांनी
होईल आता नक्की मुसळाधार म्हणालो.
नशीब येता घेऊन माझी हार कधी जर..
हार नव्हे हि,हा तर माझा सत्कार म्हणालो
पडलो उठलो रडलो हसलो इथे कितिदा!
निघतानाही आयुष्यास आभार म्हणालो..
------
कानडाऊ योगेशु
सुरेख!
धन्यवाद प्राचीतै!
मीटर गंडतंय जाम. बाकी भाव
वेल्लाभट,
हो...तसं जाणवलं पण गेयता कमी
अ प्र ति म ! अतिशय सुंदर
धन्यवाद चौ.को!
1+
सुरेख!
सुंदर रचना!
बरबादियों का जशन मनाता चला
छान.
धन्यवाद बाबा योगिराज,रातराणी
मस्त
वा! काय कल्पना!! आवडली.
मीटरमध्ये
योग्य बदल आहे च.मु साहेब.