बीज
ज्या बीजाला
अंकूरायचे असते
प्रसवायचे असते
ते पाहत नाही
तापमान किती डिग्री
हवेत आर्द्रता किती
पावसाची काही शक्यता
वा मातीचा ओलसरपणा
ते मातीत ढेकळात
खडकाच्या फटीत
इवल्या पालवीने उभारते
अस्तित्वाची दखल आपल्या
जगाला घ्यायला लावते
भोसले जी.डी.
आत्मशोध काव्यसंग्रह
बीज
पटली नाही.
बीज
छान आहे.
ही कविता तुम्ही परत
प्रगल्भ!
अरे काय चाललयं काय ?
ओ जव्हेरभौ, तुम्ही नका हो नको
उत्तरे