Skip to main content

सुख

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 04/03/2016 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
हरवलेले ते सापडले सापडले हरवल्यानंतर हरवले सापडण्याआधी      कळाले सापडल्यानंतर! तेच होते ते जरी ते न राहिले तसे तरी हवे होते ते तसेच तेव्हा      कळाले सापडल्यानंतर! भाव पुसा बाजाराला दाम जरी ना लाविला अनमोल ते आहे खरे      कळाले सापडल्यानंतर! शब्दांचा ना लागे ठाव जरी दोन अक्षरांचा गाव 'सुख' म्हणती सारे त्याला      कळाले सापडल्यानंतर! - संदीप चांदणे

वाचने 2785
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

शब्दांचा ना लागे ठाव जरी दोन अक्षरांचा गाव

वल्ली, जव्हेरगंज, नाखुकाका, हरिदास, मस्त वाटल लगेच प्रतिक्रिया वाचून! :) धन्यवाद, Sandy

:) अवडली कविता हे कळाले वाचल्यानंतर...

खेडूतअण्णा, ३ए, रातराणीतै, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! Sandy

झकास !