मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आता घे आवरते सारे

पालीचा खंडोबा १ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
उघड्या घराचे कोंदट श्वास आता जाहलेत मोकळे लख्ख डोळ्यानी, निरख वाटा दिशा दाखवतील वादळवारे आता घे आवरते सारे || प्रत्येक जगण्याने साथ सोडली गवाक्षी उरलेत पक्ष्यांचे थवे किती डोळ्यांच्या वाटा करशील का वाहतोस आठवांचे भारे आता घे आवरते सारे || जनापवाद कुणा न टळला का बंद करतोस कवाडे ? मान मनाचे सामर्थ्य तुझीया अंधारातच तेवतात तारे आता घे आवरते सारे || वाहत्या आसवांनी कुणी का परतते ? सोडूनी वर्तमानास भविष्य येते कुरवाळुनी अवमानीत भुतकाळाला कुणी असे जगतात का रे ? आता घे आवरते सारे || बघ जगी , दुख राहीले भरून सुख मिळते का कधी मरुन ? परवेदनेस मानूनी आपले डोळे पुसण्यासाठी जग रे आता घे आवरते सारे || जगभरूनी वाहतात आसवे कुणी वाहते का त्यासवे ? पिऊनी सा-या यातनासागराला एकदा तरी अगस्ती बन रे आता घे आवरते सारे || विजयकुमार..................... 14 / 12 / 2008

वाचन 2306 प्रतिक्रिया 0