Skip to main content

आता घे आवरते सारे

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी बुधवार, 13/01/2016 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
उघड्या घराचे कोंदट श्वास आता जाहलेत मोकळे लख्ख डोळ्यानी, निरख वाटा दिशा दाखवतील वादळवारे आता घे आवरते सारे || प्रत्येक जगण्याने साथ सोडली गवाक्षी उरलेत पक्ष्यांचे थवे किती डोळ्यांच्या वाटा करशील का वाहतोस आठवांचे भारे आता घे आवरते सारे || जनापवाद कुणा न टळला का बंद करतोस कवाडे ? मान मनाचे सामर्थ्य तुझीया अंधारातच तेवतात तारे आता घे आवरते सारे || वाहत्या आसवांनी कुणी का परतते ? सोडूनी वर्तमानास भविष्य येते कुरवाळुनी अवमानीत भुतकाळाला कुणी असे जगतात का रे ? आता घे आवरते सारे || बघ जगी , दुख राहीले भरून सुख मिळते का कधी मरुन ? परवेदनेस मानूनी आपले डोळे पुसण्यासाठी जग रे आता घे आवरते सारे || जगभरूनी वाहतात आसवे कुणी वाहते का त्यासवे ? पिऊनी सा-या यातनासागराला एकदा तरी अगस्ती बन रे आता घे आवरते सारे || विजयकुमार..................... 14 / 12 / 2008
लेखनविषय:

वाचने 2310
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

In reply to by पालीचा खंडोबा १

ओ मालक... तुमची शप्पथ! आधीच वाचलेली. प्रतिसादच द्यायला आलो होतो, तोवर तुमचा प्रतिसाद हजर! कविता उत्तम जमली आहे! वेगळा प्रयत्न करताय याबद्दल अभिनंदन! संध्य

In reply to by चांदणे संदीप

माझ्या नावाचा नवा अवतार = संध्य = Sandy

In reply to by पालीचा खंडोबा १

नेहमीप्रमाणेच कविता आवडली. पण तुम्ही असा प्रतिसादांचा जोगवा मागू नका हो, तुमचं लेखन त्याहून खूप वरच्या प्रतीच आहे.

प्रतिसादाची चिंता नाही हो. तो तर तुम्ही देताच परंतु माझ्या नेहमीच्या शैलीशी फारकत घेवून काही लिहिले तर ते माझ्या मित्र परिवाराने वाचावे हि माफक अपेक्षा

रंगीत शब्दांचे खडे बोचले नाहीत त्यामुळे आवडली.