चार शब्दांचा सहारा होत नाही
तेवढ्यावरती गुजारा होत नाही
खूप काही लागते जगण्यास येथे
प्रेम काही ऊनवारा होत नाही
गगनचुंबी हे तुझे आहे शहर पण
चांदतार्यांचा नजारा होत नाही
जिंदगी नुसतीच लुकलुकते दुरातुन
रोज आताशा इशारा होत नाही
टाळले मजला बरे केलेस तूही
(दु:ख दु:खावर उतारा होत नाही)
मी मनाला शिस्त आहे लावलेली
फारसा आता पसारा होत नाही
डॉ.सुनील अहिरराव
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5023
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त! आवडली!
तुमच्या कविता आवडतात.
अहाहा....
@सुरेख गजल! एकेक शेर असा
In reply to अहाहा.... by चांदणे संदीप
सुंदर.
मस्तं!
वा छानच!
शिवाय का कोण जाणे, उगीचच थोडी
In reply to वा छानच! by बोका-ए-आझम
दोघांशी सहमत....
In reply to शिवाय का कोण जाणे, उगीचच थोडी by गवि
चार शब्दांनीच येथे तो गुजारा
जब्बर्दस्त सुन्दर .. खूप
अत्यंत सुंदर!
वा!
Class!!!!!!!!!!!!
मस्तच
@रातराणी, गवि, चंदने संदीप
सुरेख!
सुरेख...
मस्तं! आवडली.
आवडली