या नभातील तारका तू मी तुझा गं चांदवा
सावली माझी जणू तू मी तुझ्यातील गारवा ।।
रंग हे तारांगणीचे रंगले नयनी तुझ्या
छंद माझे गंध होऊन दंगले स्वप्नी तुझ्या
तू असे आकार माझा मी गुलाबी ही हवा
सावली माझी जणू तू मी तुझ्यातील गारवा ।।
अंतरीचे ते चिरंतर स्वप्न तु जे पाहीले
तेच माझ्या या मनाच्या अंतरीही रंगले
तुच सारी राञ माझी मी नशीला काजवा
सावली माझी जणू तू मी तुझ्यातील गारवा ।।
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3040
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्लासच माहीराज!!!
जाम भारी
क्या बात है!
धन्यवाद ...
आवडली!
छान!
मागील सल्ला लक्षात घेऊन या
In reply to छान! by पैसा
पण (ञ)ही एक typing mistek आहे
In reply to छान! by पैसा
असं समजलं की
In reply to पण (ञ)ही एक typing mistek आहे by माहीराज
अप्रतीम!!!
अरेवा!!!!
अप्रतिम... आवडली!!!