म्हणता म्हणता ......

शिव कन्या जे न देखे रवी...
काहीच नाही म्हणता म्हणता चंद्राभवती पडले खळे, खळेच पडले इतके सुंदर चंद्र दिसेना त्यानंतर! काहीच नाही म्हणता म्हणता चाफ्याभवती पान उमटले पानच इतके गर्भरेशमी, फूल दिसेना त्यानंतर! काहीच नाही म्हणता म्हणता बागेभवती जडली माया माया इतकी गर्दसावळी बाग दिसेना त्यानंतर! काहीच नाही, काहीच नाही कशी म्हणू मी यानंतर? तव श्वासांचे गान ऐकते इथले तिथले मिळून अंतर!
वर्गीकरण

8 टिप्पण्या 2,343 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

श्रीकृष्ण सामंत नवीन

मला कविता खूप आवडली

chetanlakhs नवीन

शब्दरचना छान जमलीय पण शेवटच्या 2 ओळींचा अर्थ लक्षात नाही आला. पहिल्या 3 कडव्यांमधे मांडलेला विचारांची माळ शेवटच्या कडव्यात तुटली असे वाटले

यशोधरा नवीन

आवडलं हे कडवं.
काहीच नाही, काहीच नाही कशी म्हणू मी यानंतर? तव श्वासांचे गान ऐकते इथले तिथले मिळून अंतर!