काहीच नाही म्हणता म्हणता
चंद्राभवती पडले खळे,
खळेच पडले इतके सुंदर
चंद्र दिसेना त्यानंतर!
काहीच नाही म्हणता म्हणता
चाफ्याभवती पान उमटले
पानच इतके गर्भरेशमी,
फूल दिसेना त्यानंतर!
काहीच नाही म्हणता म्हणता
बागेभवती जडली माया
माया इतकी गर्दसावळी
बाग दिसेना त्यानंतर!
काहीच नाही, काहीच नाही
कशी म्हणू मी यानंतर?
तव श्वासांचे गान ऐकते
इथले तिथले मिळून अंतर!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2346
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
खूप सुंदर कविता. लयबद्ध.
अप्रतिम. सुंदर लय!
लयदारलय!
सुंदर
क्या बात!!!
शब्दरचना छान जमलीय
अप्रतिम.... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Once Again - 2011 :- Hang Massiveआवडलं हे कडवं.