जाती जन्मतात.
जाती शाळेत जातात.
जाती प्रौढ़ होतात.
जाती जातीशी(च) लग्न करतात.
जाती पहिल्या -कधी सोळाव्या रात्री
आपल्याच जातीवर चढ़तात.
मग अशा रीतीने जाती
..पुन्हा कंटीन्यू होतात.
जाती गावा.बाहेरच्या
'म्हारवाड्याला' असतात.
--- जाती शहरा.बाहेच्या
'झोपड़पट्टीलाही' असतात.
जाती देशा -त्याच्या झेंड्यात असतात.
जाती
गरीबांच्या कातड्याला कायमचा चिकटलेला सर्वात वरचा 'थर' असतात.
जाती अंतयात्रा, जनाज्याला असतात.
जाती दंगली. सना-उत्सवालाही असतात.
मंदिरा, मशिदी, गुरूद्वारयाला जाती असतात.
नेमाटी, दाढी, पगड़ीलाही जाती असतात.
जाती रक्षणाला असतात,
जाती आरक्षणाला असतात.
जाती निवडणुकीला असतात.
जाती 10विच्या दाखल्याला अन
आताच्या जनगणनेलाही असतात.
जाती ॐ, अर्धचंद्र, क्रॉसला असतात
जाती गीता कुराण बायबललही असतात.
जाती शरीरालाही असतात.
त्याआधी जाती 'मनाला' असतात.
जात आर.एस.एस.ला आहे,
जात MIMला आहे,
जात सेनेला आहे,
जात पुरंदरेला आहे,
पाटीदार पटेलाना आहे,
रेल्वे रुळावर झोपलेल्या गुज्जर ,
खच्चर अन मराठ्यांना आहे.
या धर्मनिरपेक्ष देशाच्या
..रक्ता-रक्तातुन हल्ली,,
......हा अदृश्य जातीभेद
...........अखंड-अखंड वाहत असतो.
.
.
.
.
मग इथं जात कोणाला नाही??
तर ती फ़क्त 'भारताला' नाही.
पण त्यात आता कोणी राहत नाही.
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात है
जाम आवडली. क्लास.
हार्ड हिटिंग.
+१
In reply to क्या बात है by वेल्लाभट
+१
ह्म्म...
ह्म्म...
असंच आहे आणि असंच राहणार :(
असंच आहे आणि असंच राहणार :(
शेवटी हाणलेला टोला अत्यंत
शेवटी हाणलेला टोला अत्यंत मार्किक सखोल आणि सेक्युलरि दांभिकांचि भंबेरि उडवणारा आहे!
शेवटी हाणलेला टोला अत्यंत
शेवटी हाणलेला टोला अत्यंत मार्किक सखोल आणि सेक्युलरि दांभिकांचि भंबेरि उडवणारा आहे!
*मार्मिक
In reply to शेवटी हाणलेला टोला अत्यंत by अत्रुप्त आत्मा
*मार्मिक
दोन्ही बरोबर है
In reply to *मार्मिक by अत्रुप्त आत्मा
पहिले इंग्लीश आणि दुसरे मराठी म्हणून!!!!
एकदम कडक...!
एकदम कडक...!
चाबूक..
वरचा क्लास !!
उत्कृष्ठ
उत्कृष्ठ
सत्य, टाळता न येणारे, हतबलता
सत्य, टाळता न येणारे, हतबलता आणणारे आणि बरेच काही.
आवडली कविता.
मस्त लिहीलीय
मस्त लिहीलीय
काय सुंदर लिहीलंय !!
.