पिल्लु
इवल्याशा डोळ्यातला
भाव तो काय ?
नभातल्या चांदण्याचा
गाव तो हाय
पायातल्या छुमछुमचा
नाद तो काय ?
आनंदाच्या लहरीचा
ठेका तो हाय
बोबड्या भाषेतले
बोल ते काय ?
चिऊच्या घरट्यातले
हे पिल्लु हाय
गोबर्या गालातले
हास्य ते काय ?
बाबांच्या पप्पीचे
हे कारण हाय.
- शब्दमेघ, १९ जानेवरी २०१५
सहीच रे गणेशा.
गुपित सांगायचा
गणेशाच्या घरला
वाह.. मस्तं!
मस्त
लय ग्वाड अन द्वाड !
खूप गोग्गोड !!
मस्त.
(No subject)
पायातल्या छुमछुमचा
व्व्वाह
खुप सुंदर आवडली.
आवडली कविता
कविता तुमच्या पिल्लुसारखीच
छान प्रतिसादाबद्दल सर्वांचे
मस्त!
छान कविता रे गणेशा.
मस्त रे गणेशा, घरी येणार
सुंदर!