✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(डोसा इथला संपत नाही)

ध — धन्या, Wed, 10/01/2014 - 18:38
कविवर्य ग्रेस यांची क्षमा मागून... डोसा इथला संपत नाही, मज तुझी आठवण येते मी मानकरला जातो, तुझी गाडी पलीकडून जाते तो लोणी स्पंज डोसा, ती खोबर्‍याची हिरवी चटणी प्यायलो दुर्गाची कॉफी आपण, पचकन पाणी थुंकाया तो मिठा पान कलकत्त्याचा, तोंड रंगवूनी गेला मस्तानीच्या आरक्त गळ्याची, आठवण झाली मला पोथीत माणसे अवघी, सांगती कथा ती कुणाची हे संपता संपत नाही, गुर्‍हाळ त्या साधूवाण्याचे डोसा इथला संपत नाही, मज तुझी आठवण येते मी मानकरला जातो, तुझी गाडी पलीकडून जाते विशेष सुचना: शब्दबंबाळ लेख लिहून कवितेचे रसग्रहण करण्यास आमची हरकत नाही. मात्र कवितेत साहित्यिक मुल्य शोधण्याचा तसेच मीटर लावण्याचा प्रयत्न करु नये. पदरी निराशा येईल.

प्रतिक्रिया द्या
7313 वाचन

💬 प्रतिसाद (49)

=))

पैसा
Wed, 10/01/2014 - 18:55 नवीन
मानकर डोसा खाणार्‍या एका जिल्बीप्रेमीच्या आठवणीने ड्वाले पाणावले! =)) बादवे ती गाडी अ‍ॅक्टिव्हा होती काय रे किंवा अल्टो? :D
  • Log in or register to post comments

ते ईतर बर्‍याच गोष्टींवर

धन्या
Wed, 10/01/2014 - 19:04 नवीन
ते ईतर बर्‍याच गोष्टींवर अवलंबून असते. मात्र "उडनमांडी" भावमुद्रेतील अ‍ॅक्टीव्हाचालन आमच्या अजूनही लक्षात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हीच का ती उडणमांडी

खटपट्या
गुरुवार, 10/02/2014 - 01:31 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

मिपावर शीघ्र-कवींप्रमाणे

शिद
गुरुवार, 10/02/2014 - 02:54 नवीन
मिपावर शीघ्र-कवींप्रमाणे शिघ्र-चित्रकार आहेत हे पाहून आनंद जाहला. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

सहीच

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 10/02/2014 - 07:29 नवीन
१९९१ साली श्री एस. व्ही. ब्रह्मे यांनी गणेशखिंड रस्त्यावर केलेली लुनायात्रा जितकी ऐतिहासिक आहे तितकीच २०१३ साली एका मिपाकराने सिंहगड रस्त्यावर केलेली मांडीयात्रा ऐतिहासिक आहे. तो ऐतिहासिक क्षण दुसर्‍या एका मिपाकराने अलगदपणे चतुरभ्रमणध्वनीत टिपला अन आज तुमच्या कुंचल्यातून उतरला. या कामगिरीकरीता दंडवत स्वीकारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

हे शिघ्र रेखाचित्र छान जमलंय

धन्या
गुरुवार, 10/02/2014 - 07:43 नवीन
हे शिघ्र रेखाचित्र छान जमलंय यात शंकाच नाही. मात्र आमच्या संग्रही असेच एक प्रकाशचित्र आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

अरारारा !!!

खटपट्या
गुरुवार, 10/02/2014 - 07:54 नवीन
अरारारा !!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

हे म्हणजे 'मास्तर उग्वे'

बॅटमॅन
Tue, 10/07/2014 - 16:59 नवीन
हे म्हणजे 'मास्तर उग्वे' गुरुजी कुंगफू आणि ताई-ची इ. च्या कोर्सला चाललेतसं दिस्तंय. तोंड पर्फेक्ट मास्तर ऊग्वेच!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

एका जिल्बीप्रेमीच्या आठवणीने

निराकार गाढव
Wed, 10/01/2014 - 20:06 नवीन
एका जिल्बीप्रेमीच्या आठवणीने
मलाबी जिल्बी लै आवाडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

विडंबने इथली संपत नाहीत...

एस
Wed, 10/01/2014 - 18:58 नवीन
ग्रेसच्या कवितेचं विडंबन जमलेलं नाही, पण शब्दबंबाळपणाचं खंडनमंडन जमलंय. शेवटची विशेष सूचना आवडली. :-)
  • Log in or register to post comments

+1

काउबॉय
Wed, 10/01/2014 - 19:52 नवीन
हेच बोलतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

कंपुबाजांनी ,कंपुबाजांसाठी

जेपी
Wed, 10/01/2014 - 19:05 नवीन
कंपुबाजांनी ,कंपुबाजांसाठी ,कंपुबाजामार्फत काढलेला धागा. *wink*
  • Log in or register to post comments

कंपू? ते काय असतं?

धन्या
Wed, 10/01/2014 - 19:09 नवीन
कंपू? ते काय असतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

कंपू ?ते काय असत?

जेपी
Wed, 10/01/2014 - 19:14 नवीन
कंपू ?ते काय असत? >>>>> अल्लेले काय त्ये भाबडेपणा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

+ ११११११११११

माम्लेदारचा पन्खा
Wed, 10/01/2014 - 23:55 नवीन
जेपिराव...अगदीच मनकवडे ब्वा तुमी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

सहमत

सुहास झेले
Fri, 10/03/2014 - 08:39 नवीन
सहमत =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

>> मात्र कवितेत साहित्यिक

सूड
Wed, 10/01/2014 - 19:08 नवीन
>> मात्र कवितेत साहित्यिक मुल्य शोधण्याचा तसेच मीटर लावण्याचा प्रयत्न करु नये. पदरी निराशा येईल. हे विशेष आवडलं. 'स्कुटीवर बैसोनि दुडदुडा येसि आणिक चटणीडोसे मान्करला खासि' अशी आरती मध्यंतरी लिहायची लहर आली होती. ;) पण काही कारणास्त्व ते जमलं नाही.
  • Log in or register to post comments

वा!

विटेकर
Wed, 10/01/2014 - 19:26 नवीन
अभिजात मराठी साहित्यात या कवितेने जो भारदस्तपणा आणला आहे त्याला तोड नाही . मराठी सारस्वताच्या गेल्या साडे आठशे वर्षांच्या इतिहासात इतके ठाशिव आणि रेखीव कोणी लिहिले नव्हते. एकाच वेळी भडभुन्जे रसिक आणि पळपुटे समिक्शक यांना कुंपणावरच रेटल्याचे वास्तववादी भान या काव्याने निर्माण केले आहे.
  • Log in or register to post comments

=))

सुहास..
Wed, 10/01/2014 - 19:28 नवीन
छान !! पण डोसाच का ? इडली का नाही ;)
  • Log in or register to post comments

मेदु वडा मला फार आवडतो ... तो

जेनी...
Wed, 10/01/2014 - 19:47 नवीन
मेदु वडा मला फार आवडतो ... तो का नाहि??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

सुहास दोन डॉट आणि जेनी तीन

धन्या
Wed, 10/01/2014 - 19:52 नवीन
सुहास दोन डॉट आणि जेनी तीन डॉट, कविता डोसा या पदार्थावर आहे याची बेशर्त स्विकृती व्हायला हवी तुमच्याकडून. मी कवितेच्या विशेष सुचनेत "शब्दबंबाळ लेख लिहून कवितेचे रसग्रहण करण्यास आमची हरकत नाही" असं म्हटलं आहे. कवितेची "यात इडली का नाही, मेदु वडा का नाही" अशी समिक्षा करा असं म्हटलेलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

छ्या राव!! नदीपलिकडे असलात

सूड
Wed, 10/01/2014 - 19:54 नवीन
छ्या राव!! नदीपलिकडे असलात म्हणून काय झालं, पुण्यात राहता हे जाणवण्याइतपत तरी धारदार होऊ देत शब्द!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

पुण्याची हद्द कुठे संपते हे

धन्या
Wed, 10/01/2014 - 20:00 नवीन
पुण्याची हद्द कुठे संपते हे एकदा आमच्या त्या मधल्या आळीतल्या मध्याला विचारायला हवं. तो म्हणे पूर्वी पेठेत राहायचा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

क्लासिक....!

काउबॉय
Wed, 10/01/2014 - 20:00 नवीन
:D -धंक्षी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

मला बटाटा वडा आवडतो.

जेपी
Wed, 10/01/2014 - 19:54 नवीन
मला बटाटा वडा आवडतो. तो का नाही ?
  • Log in or register to post comments

याचे उत्तर मी वरच्या एका

धन्या
Wed, 10/01/2014 - 19:57 नवीन
याचे उत्तर मी वरच्या एका प्रतिसादात आधीच दिले आहे.
मी कवितेच्या विशेष सुचनेत "शब्दबंबाळ लेख लिहून कवितेचे रसग्रहण करण्यास आमची हरकत नाही" असं म्हटलं आहे. कवितेची "यात इडली का नाही, मेदु वडा का नाही" अशी समिक्षा करा असं म्हटलेलं नाही.
तुमचा बटाटा वडा सुद्धा अ‍ॅड करा माझ्या वरच्या प्रतिसादात. कोटमधील वाक्ये पिवळी कशी करायची हे कुणी सांगेल का? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

कोटमधील वाक्ये पिवळी कशी

सुहास..
Wed, 10/01/2014 - 20:48 नवीन
कोटमधील वाक्ये पिवळी कशी करायची हे कुणी सांगेल का? >> विशेष पिवळा : शब्दपिवळा लेख लिहून कवितेचे रसपिवळे करण्यास आमची पिवळी नाही. मात्र कवितेत पिवळे मुल्य शोधण्याचा तसेच मीटर पिवळ्ण्याचा प्रयत्न करु नये. पिवळी निराशा येईल. येव्हढे पिवळे बस का ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

अरारा... लैच पिवळे झाले.

धन्या
Wed, 10/01/2014 - 20:54 नवीन
अरारा... लैच पिवळे झाले. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

बाकीचे राहुद्या .ते वाक्य

जेपी
Wed, 10/01/2014 - 20:04 नवीन
बाकीचे राहुद्या .ते वाक्य पिवळे करु नका. नाय ते विचार येतात डोक्यात
  • Log in or register to post comments

कुणी काय पिवळं कसं करायचं

जेनी...
Wed, 10/01/2014 - 20:09 नवीन
=)) कुणी काय पिवळं कसं करायचं विचारलं ... कि माझ्यापण डॉक्यात नक्को नक्को ते विचार येतात =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

अहो पण वाक्य पिवळं केलं नाही

धन्या
Wed, 10/01/2014 - 20:39 नवीन
अहो पण वाक्य पिवळं केलं नाही तर मी लोकांच्या प्रश्नाला आधीच उत्तर दिलंय हे लोकांना कळणार कसं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

(No subject)

दशानन
Wed, 10/01/2014 - 20:59 नवीन
=))
  • Log in or register to post comments

प्रियकराला तिची आठवण आली आणि

विवेकपटाईत
Wed, 10/01/2014 - 21:11 नवीन
प्रियकराला तिची आठवण आली आणि डोस्या सारखा स्वादिष्ट पदार्थ ही गळया खालील उतरला नाही. किती प्रेम आहे त्याचे तिच्यावर. तिची गाडी पलीकडून जाते अर्थात या जन्मी तरी मिलन होणार नाही, हे जरी खरे असले तरी कदाचित पलीकडे जाणार्या गाडीच्या खिडकीतून तिचे ओझरते दर्शन झाले असेल. तेच स्मरण करत आयुष्य कंठ्णारा हा प्रियकर जगा वेगळा आहेच. तिच्या प्रेमात बुडालेला हा उपाशी राहून तिच्यासाठी प्राणाचाही त्याग करणार. या वेगळे प्रेमाचे काय उदात्त चित्रण काय असेल. माझ्या जवळ शब्द नाही एखादा खंदा समीक्षकच या कवितेचे योग्य मूल्यमापन करू शकेल.
  • Log in or register to post comments

मानकरचा डोसा बरा असतो. पण

श्रीगुरुजी
Wed, 10/01/2014 - 21:12 नवीन
मानकरचा डोसा बरा असतो. पण चटणीत भरमसाठ साखर घालतात. बाकी विडंबन बरे जमले आहे. आता "बाकरवडी इथली संपत नाही" असे विडंबन येऊ द्या.
  • Log in or register to post comments

डोसा न्हवे उत्तापा

काउबॉय
Wed, 10/01/2014 - 23:59 नवीन
पनीर उत्तापा खावा डोसा आपला फक्त काव्या पुरता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

दिवसभर अक्षीचे गधेगाळ शोधत

प्रचेतस
Wed, 10/01/2014 - 22:03 नवीन
=)) दिवसभर अक्षीचे गधेगाळ शोधत हिंडत असल्याने तुझा डोसा आता पाहिला. बाकी ह्या निमित्ताने 'टाकला होता डोसा, आमलेट कस्सं बाहेर आलं' अशा ओळी असलेल्या एका अजरामर काव्याची आठवण आली.
  • Log in or register to post comments

@ 'टाकला होता डोसा, आमलेट

अत्रुप्त आत्मा
Wed, 10/01/2014 - 23:33 नवीन
@ 'टाकला होता डोसा, आमलेट कस्सं बाहेर आलं' >>> :-/ दु..दु.. Image removed. हत्ती!!! =========== धन्या>>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मस्त

मित्रहो
Wed, 10/01/2014 - 23:03 नवीन
*lol*
  • Log in or register to post comments

हे मानकर कोण?

मुक्त विहारि
Wed, 10/01/2014 - 23:13 नवीन
धन्यवाद.... आणि डोसा पेक्षा "ढोसा" जास्त उत्तम...
  • Log in or register to post comments

"मानकर डोसा" म्हणून पुण्यात

धन्या
Wed, 10/01/2014 - 23:35 नवीन
"मानकर डोसा" म्हणून पुण्यात डोसा केंद्रे आहेत "चितळेंची बाकरवडी" टाईपची. चांगल्या चवीचे डोश्याचे विविध प्रकार मिळतात त्यांच्याकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आणि डोसा पेक्षा "ढोसा" जास्त

जेपी
गुरुवार, 10/02/2014 - 09:54 नवीन
आणि डोसा पेक्षा "ढोसा" जास्त उत्तम... ढोसायला जाउन चकणा का लपवता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

पीठं इथले संपत नाही, मन किती

अत्रुप्त आत्मा
Wed, 10/01/2014 - 23:47 नवीन
पीठं इथले संपत नाही, मन किती ऑर्डरी देते??? :p मी झारा हाती घेतो, अन जिल्बी तळवली जाते! =))
  • Log in or register to post comments

तो सूड मंद* कुजकासा,हत्तीस

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/02/2014 - 00:01 नवीन
तो सूड मंद* कुजकासा,हत्तीस सांगूनी गेला एकाच्या :p मन'वासातील शब्दांनी गोंधळ केला!
  • Log in or register to post comments

अगायायायायायाया

बॅटमॅन
गुरुवार, 10/02/2014 - 01:17 नवीन
अगायायायायायाया =)) फुल गोंधळ चाललाय. एखादी पंडिती जिल्बी टाकावी काय? फुरसत होईल तशी टाकतोच.
  • Log in or register to post comments

आमची ही

चौकटराजा
गुरुवार, 10/02/2014 - 05:59 नवीन
जिलबी इथली संपत नाही , एक्का, तुमची आठवण येते मी मिपावरती येतो तुमचे विमान ओमान ला जाते
  • Log in or register to post comments

डोसा अन जिलबी

कंजूस
गुरुवार, 10/02/2014 - 06:36 नवीन
कोटातली अक्षरे पिवळी करून जिलबित पाक मुरवायचा खटाटोप करण्यापेक्षा पिठ जरा जास्तीआंबवा.
  • Log in or register to post comments

वा वा वा

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 10/02/2014 - 06:50 नवीन
विडंबन छान जमले आहे. बाकी यामुळे एका नव्या दभाउ साखळी बद्दल ठाऊक झाले - http://mankardosacentre.com/.
  • Log in or register to post comments

निवांत झोप

निराकार गाढव
गुरुवार, 10/02/2014 - 16:37 नवीन
हSSम्म्मSSS. चालू द्यात. आता जरा निवांत झोप घ्यावी म्हणतो. Image removed.
  • Log in or register to post comments

तो लोणी स्पंज डोसा, ती खोबर्

प्रकाश१११
Sat, 10/04/2014 - 20:07 नवीन
तो लोणी स्पंज डोसा, ती खोबर्‍याची हिरवी चटणी प्यायलो दुर्गाची कॉफी आपण, पचकन पाणी थुंकाया----झकास
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा