कविवर्य ग्रेस यांची क्षमा मागून...
डोसा इथला संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी मानकरला जातो, तुझी गाडी पलीकडून जाते
तो लोणी स्पंज डोसा, ती खोबर्याची हिरवी चटणी
प्यायलो दुर्गाची कॉफी आपण, पचकन पाणी थुंकाया
तो मिठा पान कलकत्त्याचा, तोंड रंगवूनी गेला
मस्तानीच्या आरक्त गळ्याची, आठवण झाली मला
पोथीत माणसे अवघी, सांगती कथा ती कुणाची
हे संपता संपत नाही, गुर्हाळ त्या साधूवाण्याचे
डोसा इथला संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी मानकरला जातो, तुझी गाडी पलीकडून जाते
विशेष सुचना: शब्दबंबाळ लेख लिहून कवितेचे रसग्रहण करण्यास आमची हरकत नाही. मात्र कवितेत साहित्यिक मुल्य शोधण्याचा तसेच मीटर लावण्याचा प्रयत्न करु नये. पदरी निराशा येईल.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7549
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
=))
मानकर डोसा खाणार्या एका जिल्बीप्रेमीच्या आठवणीने ड्वाले पाणावले! =)) बादवे ती गाडी अॅक्टिव्हा होती काय रे किंवा अल्टो? :D
ते ईतर बर्याच गोष्टींवर
In reply to =)) by पैसा
ते ईतर बर्याच गोष्टींवर अवलंबून असते.
मात्र "उडनमांडी" भावमुद्रेतील अॅक्टीव्हाचालन आमच्या अजूनही लक्षात आहे.
हीच का ती उडणमांडी
In reply to ते ईतर बर्याच गोष्टींवर by धन्या
मिपावर शीघ्र-कवींप्रमाणे
In reply to हीच का ती उडणमांडी by खटपट्या
मिपावर शीघ्र-कवींप्रमाणे शिघ्र-चित्रकार आहेत हे पाहून आनंद जाहला. :D
सहीच
In reply to हीच का ती उडणमांडी by खटपट्या
१९९१ साली श्री एस. व्ही. ब्रह्मे यांनी गणेशखिंड रस्त्यावर केलेली लुनायात्रा जितकी ऐतिहासिक आहे तितकीच २०१३ साली एका मिपाकराने सिंहगड रस्त्यावर केलेली मांडीयात्रा ऐतिहासिक आहे.
तो ऐतिहासिक क्षण दुसर्या एका मिपाकराने अलगदपणे चतुरभ्रमणध्वनीत टिपला अन आज तुमच्या कुंचल्यातून उतरला.
या कामगिरीकरीता दंडवत स्वीकारा.
हे शिघ्र रेखाचित्र छान जमलंय
In reply to सहीच by श्रीरंग_जोशी
हे शिघ्र रेखाचित्र छान जमलंय यात शंकाच नाही.
मात्र आमच्या संग्रही असेच एक प्रकाशचित्र आहे.
अरारारा !!!
In reply to हे शिघ्र रेखाचित्र छान जमलंय by धन्या
अरारारा !!! :)
हे म्हणजे 'मास्तर उग्वे'
In reply to हीच का ती उडणमांडी by खटपट्या
हे म्हणजे 'मास्तर उग्वे' गुरुजी कुंगफू आणि ताई-ची इ. च्या कोर्सला चाललेतसं दिस्तंय. तोंड पर्फेक्ट मास्तर ऊग्वेच!!!
एका जिल्बीप्रेमीच्या आठवणीने
In reply to =)) by पैसा
मलाबी जिल्बी लै आवाडते.
विडंबने इथली संपत नाहीत...
ग्रेसच्या कवितेचं विडंबन जमलेलं नाही, पण शब्दबंबाळपणाचं खंडनमंडन जमलंय. शेवटची विशेष सूचना आवडली. :-)
+1
In reply to विडंबने इथली संपत नाहीत... by एस
हेच बोलतो.
कंपुबाजांनी ,कंपुबाजांसाठी
कंपुबाजांनी ,कंपुबाजांसाठी ,कंपुबाजामार्फत काढलेला धागा.
*wink*
कंपू? ते काय असतं?
In reply to कंपुबाजांनी ,कंपुबाजांसाठी by जेपी
कंपू? ते काय असतं?
कंपू ?ते काय असत?
In reply to कंपू? ते काय असतं? by धन्या
कंपू ?ते काय असत?
>>>>>
अल्लेले काय त्ये भाबडेपणा
=))
+ ११११११११११
In reply to कंपुबाजांनी ,कंपुबाजांसाठी by जेपी
जेपिराव...अगदीच मनकवडे ब्वा तुमी !
सहमत
In reply to कंपुबाजांनी ,कंपुबाजांसाठी by जेपी
सहमत =))
>> मात्र कवितेत साहित्यिक
>> मात्र कवितेत साहित्यिक मुल्य शोधण्याचा तसेच मीटर लावण्याचा प्रयत्न करु नये. पदरी निराशा येईल.
हे विशेष आवडलं. 'स्कुटीवर बैसोनि दुडदुडा येसि आणिक चटणीडोसे मान्करला खासि' अशी आरती मध्यंतरी लिहायची लहर आली होती. ;) पण काही कारणास्त्व ते जमलं नाही.
वा!
अभिजात मराठी साहित्यात या कवितेने जो भारदस्तपणा आणला आहे त्याला तोड नाही . मराठी सारस्वताच्या गेल्या साडे आठशे वर्षांच्या इतिहासात इतके ठाशिव आणि रेखीव कोणी लिहिले नव्हते. एकाच वेळी भडभुन्जे रसिक आणि पळपुटे समिक्शक यांना कुंपणावरच रेटल्याचे वास्तववादी भान या काव्याने निर्माण केले आहे.
=))
छान !! पण डोसाच का ? इडली का नाही ;)
मेदु वडा मला फार आवडतो ... तो
In reply to =)) by सुहास..
मेदु वडा मला फार आवडतो ... तो का नाहि??
सुहास दोन डॉट आणि जेनी तीन
In reply to मेदु वडा मला फार आवडतो ... तो by जेनी...
सुहास दोन डॉट आणि जेनी तीन डॉट, कविता डोसा या पदार्थावर आहे याची बेशर्त स्विकृती व्हायला हवी तुमच्याकडून.
मी कवितेच्या विशेष सुचनेत "शब्दबंबाळ लेख लिहून कवितेचे रसग्रहण करण्यास आमची हरकत नाही" असं म्हटलं आहे. कवितेची "यात इडली का नाही, मेदु वडा का नाही" अशी समिक्षा करा असं म्हटलेलं नाही.
छ्या राव!! नदीपलिकडे असलात
In reply to सुहास दोन डॉट आणि जेनी तीन by धन्या
छ्या राव!! नदीपलिकडे असलात म्हणून काय झालं, पुण्यात राहता हे जाणवण्याइतपत तरी धारदार होऊ देत शब्द!! ;)
पुण्याची हद्द कुठे संपते हे
In reply to छ्या राव!! नदीपलिकडे असलात by सूड
पुण्याची हद्द कुठे संपते हे एकदा आमच्या त्या मधल्या आळीतल्या मध्याला विचारायला हवं. तो म्हणे पूर्वी पेठेत राहायचा. ;)
क्लासिक....!
In reply to सुहास दोन डॉट आणि जेनी तीन by धन्या
:D
-धंक्षी
मला बटाटा वडा आवडतो.
मला बटाटा वडा आवडतो.
तो का नाही ?
याचे उत्तर मी वरच्या एका
In reply to मला बटाटा वडा आवडतो. by जेपी
याचे उत्तर मी वरच्या एका प्रतिसादात आधीच दिले आहे.
तुमचा बटाटा वडा सुद्धा अॅड करा माझ्या वरच्या प्रतिसादात.
कोटमधील वाक्ये पिवळी कशी करायची हे कुणी सांगेल का? :(
कोटमधील वाक्ये पिवळी कशी
In reply to याचे उत्तर मी वरच्या एका by धन्या
कोटमधील वाक्ये पिवळी कशी करायची हे कुणी सांगेल का? >>
विशेष पिवळा : शब्दपिवळा लेख लिहून कवितेचे रसपिवळे करण्यास आमची पिवळी नाही. मात्र कवितेत पिवळे मुल्य शोधण्याचा तसेच मीटर पिवळ्ण्याचा प्रयत्न करु नये. पिवळी निराशा येईल.
येव्हढे पिवळे बस का ;)
अरारा... लैच पिवळे झाले.
In reply to कोटमधील वाक्ये पिवळी कशी by सुहास..
अरारा... लैच पिवळे झाले. :D
बाकीचे राहुद्या .ते वाक्य
बाकीचे राहुद्या .ते वाक्य पिवळे करु नका.
नाय ते विचार येतात डोक्यात
कुणी काय पिवळं कसं करायचं
In reply to बाकीचे राहुद्या .ते वाक्य by जेपी
=))
कुणी काय पिवळं कसं करायचं विचारलं ... कि माझ्यापण डॉक्यात नक्को नक्को ते विचार येतात =))
अहो पण वाक्य पिवळं केलं नाही
In reply to कुणी काय पिवळं कसं करायचं by जेनी...
अहो पण वाक्य पिवळं केलं नाही तर मी लोकांच्या प्रश्नाला आधीच उत्तर दिलंय हे लोकांना कळणार कसं?
(No subject)
=))
प्रियकराला तिची आठवण आली आणि
प्रियकराला तिची आठवण आली आणि डोस्या सारखा स्वादिष्ट पदार्थ ही गळया खालील उतरला नाही. किती प्रेम आहे त्याचे तिच्यावर. तिची गाडी पलीकडून जाते अर्थात या जन्मी तरी मिलन होणार नाही, हे जरी खरे असले तरी कदाचित पलीकडे जाणार्या गाडीच्या खिडकीतून तिचे ओझरते दर्शन झाले असेल. तेच स्मरण करत आयुष्य कंठ्णारा हा प्रियकर जगा वेगळा आहेच. तिच्या प्रेमात बुडालेला हा उपाशी राहून तिच्यासाठी प्राणाचाही त्याग करणार. या वेगळे प्रेमाचे काय उदात्त चित्रण काय असेल. माझ्या जवळ शब्द नाही एखादा खंदा समीक्षकच या कवितेचे योग्य मूल्यमापन करू शकेल.
मानकरचा डोसा बरा असतो. पण
मानकरचा डोसा बरा असतो. पण चटणीत भरमसाठ साखर घालतात.
बाकी विडंबन बरे जमले आहे.
आता "बाकरवडी इथली संपत नाही" असे विडंबन येऊ द्या.
डोसा न्हवे उत्तापा
In reply to मानकरचा डोसा बरा असतो. पण by श्रीगुरुजी
पनीर उत्तापा खावा डोसा आपला फक्त काव्या पुरता.
दिवसभर अक्षीचे गधेगाळ शोधत
=))
दिवसभर अक्षीचे गधेगाळ शोधत हिंडत असल्याने तुझा डोसा आता पाहिला.
बाकी ह्या निमित्ताने 'टाकला होता डोसा, आमलेट कस्सं बाहेर आलं' अशा ओळी असलेल्या एका अजरामर काव्याची आठवण आली.
@ 'टाकला होता डोसा, आमलेट
In reply to दिवसभर अक्षीचे गधेगाळ शोधत by प्रचेतस
@ 'टाकला होता डोसा, आमलेट कस्सं बाहेर आलं' >>> :-/ दु..दु..
हत्ती!!!
===========
धन्या>>>
मस्त
*lol*
हे मानकर कोण?
धन्यवाद....
आणि डोसा पेक्षा "ढोसा" जास्त उत्तम...
"मानकर डोसा" म्हणून पुण्यात
In reply to हे मानकर कोण? by मुक्त विहारि
"मानकर डोसा" म्हणून पुण्यात डोसा केंद्रे आहेत "चितळेंची बाकरवडी" टाईपची. चांगल्या चवीचे डोश्याचे विविध प्रकार मिळतात त्यांच्याकडे.
आणि डोसा पेक्षा "ढोसा" जास्त
In reply to हे मानकर कोण? by मुक्त विहारि
आणि डोसा पेक्षा "ढोसा" जास्त उत्तम...ढोसायला जाउन चकणा का लपवता.
पीठं इथले संपत नाही, मन किती
पीठं इथले संपत नाही, मन किती ऑर्डरी देते??? :p
मी झारा हाती घेतो, अन जिल्बी तळवली जाते! =))
तो सूड मंद* कुजकासा,हत्तीस
तो सूड मंद* कुजकासा,हत्तीस सांगूनी गेला
एकाच्या :p मन'वासातील शब्दांनी गोंधळ केला!
अगायायायायायाया
अगायायायायायाया =))
फुल गोंधळ चाललाय. एखादी पंडिती जिल्बी टाकावी काय? फुरसत होईल तशी टाकतोच.
आमची ही
जिलबी इथली संपत नाही , एक्का, तुमची आठवण येते
मी मिपावरती येतो तुमचे विमान ओमान ला जाते
डोसा अन जिलबी
कोटातली अक्षरे पिवळी करून जिलबित पाक मुरवायचा खटाटोप करण्यापेक्षा पिठ जरा जास्तीआंबवा.
वा वा वा
विडंबन छान जमले आहे.
बाकी यामुळे एका नव्या दभाउ साखळी बद्दल ठाऊक झाले - https://mankardosacentre.com/.
निवांत झोप
हSSम्म्मSSS. चालू द्यात. आता जरा निवांत झोप घ्यावी म्हणतो.

तो लोणी स्पंज डोसा, ती खोबर्
तो लोणी स्पंज डोसा, ती खोबर्याची हिरवी चटणी
प्यायलो दुर्गाची कॉफी आपण, पचकन पाणी थुंकाया----झकास