Skip to main content

घरात भरल्या घुसले उंदीर...

लेखक अविनाश ओगले यांनी शुक्रवार, 25/07/2008 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
घरात भरल्या घुसले उंदीर गणयंत्राच्या समोर बसले ज्ञानपिपासू अधीर डोळे चकाकत्या पडद्याला डसले ज्ञानाची ती अपार विश्चे; हवे हवे ते क्षणात वेचून क्लिकक्लिकणारा उंदीर आणी- थेट घरातच अवघे खेचून गणक ऋषींच्या नव्या पिढीचे उंदीर हेची बाप जहाले माणूसघाणे, बधीर रोबो घराघरांतून जन्मा आले. -अविनाश ओगले
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 4417
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

क्या बात है ! माणूसघाणे, बधीर रोबो घराघरांतून जन्मा आले. ह्यात "रोबो" हा शब्द इतका चपखल बसलाय! वा ! - सर्किट

In reply to by मुक्तसुनीत

अविनाश मर्ढेकर ! :-) हेच म्हणत होतो मी पण. उत्तम कविता झालि आहे अविनाशशेठ. पुण्याचे पेशवे

In reply to by मुक्तसुनीत

पिपात मेले ओल्या उंदीर माना पडल्या मुरगळल्याविण..... मर्ढेकरांची आठवण झाली. ओगले साहेब, अजून येऊ द्या !!! अशाच नवकविता.

अविनाशशेठ, 'रोबो' पांगळा करुन गेला! उच्च!! चतुरंग

सुरुवातीला ज्ञानपिपासू, शेवटी बधीर... ("डसण्या" सुरुवातीलाच उंदरांच्या सुळसुळाटातला अपशकून दाखवला होता.) मार्मिक कलाटणी! शब्दांची निवड नेमकी आणि प्रभावी वाटली.

गणक ऋषींच्या नव्या पिढीचे उंदीर हेची बाप जहाले माणूसघाणे, बधीर रोबो घराघरांतून जन्मा आले. पटले!

गणक ऋषींच्या नव्या पिढीचे उंदीर हेची बाप जहाले माणूसघाणे, बधीर रोबो घराघरांतून जन्मा आले. वा! क्या बात है.... :)

माणूसघाणे, बधीर रोबो घराघरांतून जन्मा आले. वा! खरंच खूप सुंदर आहे कविता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वा पंत, क्या बात है! सही. धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञान्या हाती| मुक्ता आत्मस्थिती सांडवीन||

अतिशय सुंदर कविता मनापासुन आवडली