घरात भरल्या घुसले उंदीर
गणयंत्राच्या समोर बसले
ज्ञानपिपासू अधीर डोळे
चकाकत्या पडद्याला डसले
ज्ञानाची ती अपार विश्चे;
हवे हवे ते क्षणात वेचून
क्लिकक्लिकणारा उंदीर आणी-
थेट घरातच अवघे खेचून
गणक ऋषींच्या नव्या पिढीचे
उंदीर हेची बाप जहाले
माणूसघाणे, बधीर रोबो
घराघरांतून जन्मा आले.
-अविनाश ओगले
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4417
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त, रोबो
असेच म्हणतो
In reply to मस्त, रोबो by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
मी पण सहमत
In reply to मस्त, रोबो by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
अविनाश मर्ढेकर ! :-)
+१
In reply to अविनाश मर्ढेकर ! :-) by मुक्तसुनीत
नव जगाची कविता......!!!
In reply to अविनाश मर्ढेकर ! :-) by मुक्तसुनीत
जबरा!
कलाटणी
भारी
गणक
माणूसघाणे,
सुरेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वा पंत
वा...
मस्त ओगलेसाहेब!