मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कारण जीवन हे लोणचं आहे...

भिकापाटील · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कधी गोड, कधी तिखट आहे कधी खारट, कधी तुरट आहे कारण जीवन हे लोणचं आहे...||१|| ... लोणचं पूर्ण मुरल्यावर चांगला लागतं खाल्ल्यावर जीवन पूर्ण जगल्यावर टेकतो आपण मरणावर ||२|| लोणचं करण्यासाठी जसे विविध प्रकार जीवनातल्या पैलूंचे हि निरनिराळे प्रकार लोणचं जसं testy लागतं तसच जीवन हे फार कष्टी असतं कारण जीवन हे लोणचं आहे....||३|| लोणच्याला राहायला जशी बरणी लागते तसच जीवन जगायला धरणी लागते लोणचं जसं कधी ना कधी संपतं तसंच आपलं जीवनहि कधी ना कधी संपतं कारण जीवन हे लोणचं आहे....||४|| लोणचं हे खाण्यासाठी असतं पण जीवन हे जगण्यासाठी असतं लोणच्याला जसं स्वाद असतो तसं आपल्या जीवनाला एक आस्वाद असतो कारण जीवन हे लोणचं आहे.. कवीवर्य भिकापाटील.

वाचने 3685 वाचनखूण प्रतिक्रिया 13

स्पा 31/12/2013 - 13:04
आमच्या चचाची आठवण आली हे काव्य वाचून

In reply to by प्यारे१

धन्या 01/01/2014 - 20:21
'आतातरी' सोडा रे त्याला.
एक शेर आठवला: गुल गया, गुलशन गया, गयी होठोंकी लाली अब तो पिछा छोड उसका, वोह हो गयी बाल बच्चोंवाली

खेडूत 31/12/2013 - 14:37
याच लोणच्याचं एक पाकीट जीमेल वरून आलं आहे. पण अजून फोडलं नाही! :)

In reply to by सूड

बॅटमॅन 01/01/2014 - 15:24
सग़ळ्यात वेग़ळे जीवन भाऊच़, त्यांना लोणचं म्हट़ल्याचा़ मी निषेध़ क़ऱतो.

संपादक मंडळ 01/01/2014 - 01:03
ही कविता नक्की आपली स्वतःचीच आहे का? ही https://www.facebook.com/kavyanjali.bhavnanche.bandhan/posts/327433163960580 या पानावर February 17, 2012 या तारखेला आलेली दिसत आहे.

तिमा 01/01/2014 - 17:57
जीवनभाऊंना काँपिटिशन आहे. लोणच्याला राहायला जशी बरणी लागते तसच जीवन जगायला धरणी लागते या दोन ओळी वाचून सदगदित झालो.