Skip to main content

कारण जीवन हे लोणचं आहे...

लेखक भिकापाटील यांनी मंगळवार, 31/12/2013 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
कधी गोड, कधी तिखट आहे कधी खारट, कधी तुरट आहे कारण जीवन हे लोणचं आहे...||१|| ... लोणचं पूर्ण मुरल्यावर चांगला लागतं खाल्ल्यावर जीवन पूर्ण जगल्यावर टेकतो आपण मरणावर ||२|| लोणचं करण्यासाठी जसे विविध प्रकार जीवनातल्या पैलूंचे हि निरनिराळे प्रकार लोणचं जसं testy लागतं तसच जीवन हे फार कष्टी असतं कारण जीवन हे लोणचं आहे....||३|| लोणच्याला राहायला जशी बरणी लागते तसच जीवन जगायला धरणी लागते लोणचं जसं कधी ना कधी संपतं तसंच आपलं जीवनहि कधी ना कधी संपतं कारण जीवन हे लोणचं आहे....||४|| लोणचं हे खाण्यासाठी असतं पण जीवन हे जगण्यासाठी असतं लोणच्याला जसं स्वाद असतो तसं आपल्या जीवनाला एक आस्वाद असतो कारण जीवन हे लोणचं आहे.. कवीवर्य भिकापाटील.
लेखनविषय:

वाचने 3698
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

In reply to by प्यारे१

'आतातरी' सोडा रे त्याला.
एक शेर आठवला: गुल गया, गुलशन गया, गयी होठोंकी लाली अब तो पिछा छोड उसका, वोह हो गयी बाल बच्चोंवाली

याच लोणच्याचं एक पाकीट जीमेल वरून आलं आहे. पण अजून फोडलं नाही! :)

ही कविता नक्की आपली स्वतःचीच आहे का? ही https://www.facebook.com/kavyanjali.bhavnanche.bandhan/posts/3274331639… या पानावर February 17, 2012 या तारखेला आलेली दिसत आहे.

जीवनभाऊंना काँपिटिशन आहे. लोणच्याला राहायला जशी बरणी लागते तसच जीवन जगायला धरणी लागते या दोन ओळी वाचून सदगदित झालो.