Skip to main content

कारण जीवन हे लोणचं आहे...

लेखक भिकापाटील यांनी मंगळवार, 31/12/2013 12:45 या दिवशी प्रकाशित केले.

कधी गोड, कधी तिखट आहे
कधी खारट, कधी तुरट आहे
कारण जीवन हे लोणचं आहे...||१||
...
लोणचं पूर्ण मुरल्यावर
चांगला लागतं खाल्ल्यावर
जीवन पूर्ण जगल्यावर
टेकतो आपण मरणावर ||२||

लोणचं करण्यासाठी जसे विविध प्रकार
जीवनातल्या पैलूंचे हि निरनिराळे प्रकार
लोणचं जसं testy लागतं
तसच जीवन हे फार कष्टी असतं
कारण जीवन हे लोणचं आहे....||३||

लोणच्याला राहायला जशी बरणी लागते
तसच जीवन जगायला धरणी लागते
लोणचं जसं कधी ना कधी संपतं
तसंच आपलं जीवनहि कधी ना कधी संपतं
कारण जीवन हे लोणचं आहे....||४||

लोणचं हे खाण्यासाठी असतं
पण जीवन हे जगण्यासाठी असतं
लोणच्याला जसं स्वाद असतो
तसं आपल्या जीवनाला एक आस्वाद असतो
कारण जीवन हे लोणचं आहे..

कवीवर्य भिकापाटील.

लेखनविषय:

वाचने 3728
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

In reply to by प्यारे१

'आतातरी' सोडा रे त्याला.

एक शेर आठवला:

गुल गया, गुलशन गया, गयी होठोंकी लाली
अब तो पिछा छोड उसका, वोह हो गयी बाल बच्चोंवाली


याच लोणच्याचं एक पाकीट जीमेल वरून आलं आहे. पण अजून फोडलं नाही! :)


ही कविता नक्की आपली स्वतःचीच आहे का?
ही https://www.facebook.com/kavyanjali.bhavnanche.bandhan/posts/3274331639… या पानावर
February 17, 2012 या तारखेला आलेली दिसत आहे.


जीवनभाऊंना काँपिटिशन आहे.

लोणच्याला राहायला जशी बरणी लागते
तसच जीवन जगायला धरणी लागते

या दोन ओळी वाचून सदगदित झालो.