तू रे पल्याड गोविंदा!
लेखनविषय:
चाल चालले मी
श्वास राहिला पेटता
पाणी उसळले किती
गूढ डोहाने जपता.
जाणत्याला सारे भय
तण माजताना रानी
मस्तवाल झाले मी
त्याने तुला काय हानी?
वाया गेले एक तप
पुढे चालू राही धंदा
तुला नाही सुख दु:ख
तू रे पल्याड गोविंदा!
*अन्यत्र पूर्वप्रकाशित
वाचने
5106
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
काही झेपलं नाही मला ! असो... होत असं मला कधी तरी !
In reply to काही झेपलं नाही मला ! असो... by मदनबाण
हं! सहमत आहे. मलाही अनेकदा कविता समजत नाहीत - अगदी स्वतःच्याही. हे मी उपरोधाने म्हणत नाही, तर खरंच सांगतेय.
In reply to हं! सहमत आहे. मलाही अनेकदा by आतिवास
ओह्ह...
हे मी उपरोधाने म्हणत नाही
मी देखील उपरोधाने प्रतिसाद दिला नाही,खरतर गमतीने आणि खरचं काही न समजल्याने तसा प्रतिसाद दिला आहे.
In reply to ओह्ह...हे मी उपरोधाने म्हणत by मदनबाण
:-)
वाया गेले एक तप पुढे चालू राही धंदा तुला नाही सुख दु:ख तू रे पल्याड गोविंदा!!!
कविता वाचताना छान वाटते आहे..
समजून घ्यायचा प्रयत्न करते आहे..
नै कळ्ळं कै!
In reply to नै कळ्ळं कै! by अत्रुप्त आत्मा
:-)
माझ्या सारख्या पामराच्या सोयीसाठी कवितेच्या रसग्रहणाच्या प्रतिक्षेत आहे.
In reply to रसग्रहण. by प्रभाकर पेठकर
:-)
In reply to रसग्रहण. by प्रभाकर पेठकर
कॉलींग प्राडॉ/विटेकर..
साधरण ४० टक्के अर्थ कळला (असे वाटते)
अतितरल काव्य !
कविता अतिशय आवडली. विंदांची अशीच एक गोविंदा शब्द असलेली अत्यंत नादमधुर आणि लोकप्रिय कविता (आता पटकन आठवत नाहीय) त्यांच्याच तोंडून ऐकली होती तिची आठवण झाली.
In reply to वा by राही
कविवर्य बोरकरांची 'नाड्यावर चाले' माहिती आहे - विंदांची मात्र कोणती कविता तुम्ही म्हणताय ते आठवत नाहीये. आठवली की नक्की सांगा.
In reply to कविवर्य बोरकरांची 'नाड्यावर by आतिवास
नाडयावर चाले जशी सोनचेडी तशी माझी नाडी चालवी तू गर्दीच्या आरोळ्या ऐकू नेदी कानी किंवा तृप्त ध्वनी टाळियांचे दिसो नेदी डोळा प्रकाश वा दिशा घेतलेली रेषा सुटो नेदी खुर्द्याचे खाविंद करू देत सौदा तू मात्र गोविंदा सांडू नको.वा!
In reply to नाडयावर चाले जशी सोनचेडी by यशोधरा
खरोखर सुंदर.
'खुर्द्याचे खाविंद, करू देत सौदा, तू मात्र गोविंदा सांडू नको.'
काय बोलावे! कुठून अशी प्रतिभा येते, कुठून असे शब्द सापडतात, सारेच अनाकलनीय.
In reply to सुंदर by राही
'खुर्द्याचे खाविंद, करू देत सौदा, तू मात्र गोविंदा सांडू नको.'ह्याच ओळींवर मी मरण पावले! अतिवास, तुम्हांला किती धन्यवाद द्यावेत. :)
In reply to सुंदर by राही
काय बोलावे! कुठून अशी प्रतिभा येते, कुठून असे शब्द सापडतात, सारेच अनाकलनीय.
बोरकर, मर्ढेकर, रॉय किणीकर वाचताना तर हजार वेळा असं वाटतं :-) In reply to वा by राही
तू उंच बांधली हंडी रे. पण यात बहुधा 'गोविंदा' हा शब्द नाही. हंडी आहे म्हणून गोविंदाशी साम्य जाणवले असावे.
या कवितेत हंडीशी यमक जुळणारा हबेलंडी हा शब्द वाचताना खटकला होता. पण विंदांच्या पहाडी आवाजात आणि मोकळ्या-ढाकळ्या थाटात ऐकताना त्यातल्या ताकतीने थरारून जायला झाले होते. रसिकश्रोते आग्रह करून त्यांना ही कविता म्हणायला लावीत असे दोन-तीनदा पाहिले आहे.
गोविंदा अल्याड झाला तर डोह गूढ राहणार नाही. गोविंदा पल्याडच बरा!
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
काहितरी हललं आत....
___/\___
समजली म्हणेतोवर निसटणारी.
रसग्रहण टाकूच नये. आपापल्या मगदुरानुसार उमजू द्यावी.
काही झेपलं नाही मला ! असो...