Skip to main content

तू रे पल्याड गोविंदा!

लेखक आतिवास यांनी सोमवार, 23/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
चाल चालले मी श्वास राहिला पेटता पाणी उसळले किती गूढ डोहाने जपता. जाणत्याला सारे भय तण माजताना रानी मस्तवाल झाले मी त्याने तुला काय हानी? वाया गेले एक तप पुढे चालू राही धंदा तुला नाही सुख दु:ख तू रे पल्याड गोविंदा! *अन्यत्र पूर्वप्रकाशित
लेखनविषय:

वाचने 5106
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

In reply to by मदनबाण

हं! सहमत आहे. मलाही अनेकदा कविता समजत नाहीत - अगदी स्वतःच्याही. हे मी उपरोधाने म्हणत नाही, तर खरंच सांगतेय.

In reply to by आतिवास

ओह्ह... हे मी उपरोधाने म्हणत नाही मी देखील उपरोधाने प्रतिसाद दिला नाही,खरतर गमतीने आणि खरचं काही न समजल्याने तसा प्रतिसाद दिला आहे.

वाया गेले एक तप पुढे चालू राही धंदा तुला नाही सुख दु:ख तू रे पल्याड गोविंदा!
!!

माझ्या सारख्या पामराच्या सोयीसाठी कवितेच्या रसग्रहणाच्या प्रतिक्षेत आहे.

कविता अतिशय आवडली. विंदांची अशीच एक गोविंदा शब्द असलेली अत्यंत नादमधुर आणि लोकप्रिय कविता (आता पटकन आठवत नाहीय) त्यांच्याच तोंडून ऐकली होती तिची आठवण झाली.

In reply to by राही

कविवर्य बोरकरांची 'नाड्यावर चाले' माहिती आहे - विंदांची मात्र कोणती कविता तुम्ही म्हणताय ते आठवत नाहीये. आठवली की नक्की सांगा.

In reply to by आतिवास

नाडयावर चाले जशी सोनचेडी तशी माझी नाडी चालवी तू गर्दीच्या आरोळ्या ऐकू नेदी कानी किंवा तृप्त ध्वनी टाळियांचे दिसो नेदी डोळा प्रकाश वा दिशा घेतलेली रेषा सुटो नेदी खुर्द्याचे खाविंद करू देत सौदा तू मात्र गोविंदा सांडू नको.
वा!

In reply to by यशोधरा

खरोखर सुंदर. 'खुर्द्याचे खाविंद, करू देत सौदा, तू मात्र गोविंदा सांडू नको.' काय बोलावे! कुठून अशी प्रतिभा येते, कुठून असे शब्द सापडतात, सारेच अनाकलनीय.

In reply to by राही

'खुर्द्याचे खाविंद, करू देत सौदा, तू मात्र गोविंदा सांडू नको.'
ह्याच ओळींवर मी मरण पावले! अतिवास, तुम्हांला किती धन्यवाद द्यावेत. :)

In reply to by राही

काय बोलावे! कुठून अशी प्रतिभा येते, कुठून असे शब्द सापडतात, सारेच अनाकलनीय. बोरकर, मर्ढेकर, रॉय किणीकर वाचताना तर हजार वेळा असं वाटतं :-)

In reply to by राही

तू उंच बांधली हंडी रे. पण यात बहुधा 'गोविंदा' हा शब्द नाही. हंडी आहे म्हणून गोविंदाशी साम्य जाणवले असावे. या कवितेत हंडीशी यमक जुळणारा हबेलंडी हा शब्द वाचताना खटकला होता. पण विंदांच्या पहाडी आवाजात आणि मोकळ्या-ढाकळ्या थाटात ऐकताना त्यातल्या ताकतीने थरारून जायला झाले होते. रसिकश्रोते आग्रह करून त्यांना ही कविता म्हणायला लावीत असे दोन-तीनदा पाहिले आहे.

गोविंदा अल्याड झाला तर डोह गूढ राहणार नाही. गोविंदा पल्याडच बरा!

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.

___/\___ समजली म्हणेतोवर निसटणारी. रसग्रहण टाकूच नये. आपापल्या मगदुरानुसार उमजू द्यावी.