✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

घायाळ पापण्यांनी मैफ़ील सोडताना

उ — उपटसुंभ, Wed, 01/23/2013 - 16:18
घायाळ पापण्यांनी मैफ़ील सोडताना नाही जमेस काही आयुष्य मोजताना भाळून चालते का लाटेवरी कुणाच्या काळीज सागराचे घेऊन हिंडताना ना घातली हवा तू राखेस एकदाही सारी हयात गेली अंगार शोधताना आहेत कान त्यांच्या भिंतीस जाणतो मी आवाज होत नाही स्वप्नात बोलताना होतो बर्‍याचदा मी माझाच हाडवैरी बेभान अक्षरांचे आसूड ओढताना - उपटसुंभ

प्रतिक्रिया द्या
5096 वाचन

💬 प्रतिसाद (32)

अप्रतिम.

स्पंदना
Wed, 01/23/2013 - 16:23 नवीन
अप्रतिम. सुरेख! सुरेख!! उपटसुंभ!
  • Log in or register to post comments

आईग्ग्गं!

धमाल मुलगा
Wed, 01/23/2013 - 16:43 नवीन
काय एकेक शेर आहे देवा...शरच जणु. मोजुन दोन मिनिटात काळजात उलथापालथ झाली! तसा मी काव्यप्रकारांच्या वार्यालाही न थांबणारा, पण खरं सांगतो, नुसत्या शिर्शकानं हलवून सोडलं मला अन आपसुकच धागा उघडला साला, ओळीओळीतलं दर्द. उरात झिरपलं! जियो! जियो!! .
  • Log in or register to post comments

अग्गागा

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 01/23/2013 - 19:23 नवीन
उपटसुंभ साहेब, बारामतीकरांचा प्रतिसाद लाभला या गझलला, सोन झालं गझलेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

नुसत्या शिर्शकानं हलवून सोडलं

शुचि
Wed, 01/23/2013 - 19:54 नवीन
नुसत्या शिर्शकानं हलवून सोडलं मला अन आपसुकच धागा उघडला
रसिक आहेस :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

व्वा

अभ्या..
Wed, 01/23/2013 - 16:49 नवीन
व्वा. अतिशय सुरेख. अपर्णातैची परवानगी न घेता त्यांची स्वाक्षरी वापरुन एवढेच म्हणेन शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते । ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते ॥
  • Log in or register to post comments

छान

दत्ता काळे
Wed, 01/23/2013 - 16:50 नवीन
गझल आवडली.
  • Log in or register to post comments

खासच आहे!

पैसा
Wed, 01/23/2013 - 17:34 नवीन
खूप छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments

आवडली

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 01/23/2013 - 17:36 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments

आहेत कान त्यांच्या भिंतीस

अग्निकोल्हा
Wed, 01/23/2013 - 18:10 नवीन
आहेत कान त्यांच्या भिंतीस जाणतो मी आवाज होत नाही स्वप्नात बोलताना
काय बोललात राव! तगडं लिखाण.
  • Log in or register to post comments

स्वारी हं गिल्फुकाका .. पण मी

जेनी...
Wed, 01/23/2013 - 22:36 नवीन
स्वारी हं गिल्फुकाका .. पण मी खरच तंगडं लिखान वाचलं आणि =)) मग तो टिंब अनुस्वार नीट जागेवर ठेवला ... आणि मग एकदम तगडं लिखान :) उपट्सुंभ्या खुपच छान रचना शब्दांची .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

अप्रतिम

चाणक्य
Wed, 01/23/2013 - 18:37 नवीन
अतिशय सुंदर गझल
  • Log in or register to post comments

खत्रा!

दादा कोंडके
Wed, 01/23/2013 - 19:24 नवीन
मस्त गझल.
  • Log in or register to post comments

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 01/23/2013 - 19:51 नवीन
आवडली रचना. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आवडली

शुचि
Wed, 01/23/2013 - 19:55 नवीन
दर्दभरी रचना.
  • Log in or register to post comments

सुंदर रचना. अजून येउ देत.

कवितानागेश
Wed, 01/23/2013 - 20:23 नवीन
सुंदर रचना. अजून येउ देत. :)
  • Log in or register to post comments

एकेक शेर मोजूनमापून लिहीलाय!

संजय क्षीरसागर
Wed, 01/23/2013 - 22:28 नवीन
लगे रहो.
  • Log in or register to post comments

झक्कासच लिहिलय....।

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/23/2013 - 23:41 नवीन
झक्कासच लिहिलय....। :-) समांतर- अशीच एक रचना...अगदी वृत्त साधर्म्य/आणी रचना साधर्म्यही असलेली... :-) http://www.misalpav.com/node/23352
  • Log in or register to post comments

फेटा उडवण्यात आलेला आहे..

शैलेन्द्र
गुरुवार, 01/24/2013 - 13:33 नवीन
फेटा उडवण्यात आलेला आहे..
  • Log in or register to post comments

व्वा व्वा!!!!!!!!!!!!

यश पालकर
गुरुवार, 01/24/2013 - 14:09 नवीन
होतो बर्‍याचदा मी माझाच हाडवैरी बेभान अक्षरांचे आसूड ओढताना
व्वा व्वा काय शेर लिहिलाय उत्त्म...
  • Log in or register to post comments

मला ते मिसरा, सानी-मिसरा,

सांजसंध्या
गुरुवार, 01/24/2013 - 20:28 नवीन
मला ते मिसरा, सानी-मिसरा, मक्ता असलं काही कळत नाही. इतकंच कळलं कि गझल खूपच आवडलेली आहे. मजा आया तो रिप्लाय देने मे कंजुसी नै करनेका :)
  • Log in or register to post comments

अफाट!

क्रान्ति
Fri, 01/25/2013 - 12:03 नवीन
प्रत्येक शेर सव्वाशेर! अतिशय उत्तम गझल!
  • Log in or register to post comments

अप्रतीम गझल.

धन्या
Fri, 01/25/2013 - 12:09 नवीन
अप्रतीम गझल.
घायाळ पापण्यांनी मैफ़ील सोडताना नाही जमेस काही आयुष्य मोजताना
हा अनूभव घेतला आहे. :(
  • Log in or register to post comments

(No subject)

अद्द्या
Fri, 01/25/2013 - 12:11 नवीन
:)
  • Log in or register to post comments

मस्त..

मुक्त विहारि
Fri, 01/25/2013 - 12:37 नवीन
छान लिहिले आहे..
  • Log in or register to post comments

खुप दिवसांनी काव्य विभागात

पियुशा
Fri, 01/25/2013 - 13:04 नवीन
खुप दिवसांनी काव्य विभागात आले अन त्याच सार्थक झाल :)
  • Log in or register to post comments

वाह!!

किसन शिंदे
Fri, 01/25/2013 - 23:22 नवीन
वाह!! शिर्षकामूळे धागा आपोआप उघडला जातोय. खरं सांगू, हि रचना तूमच्या आयडीला बिलकूल साजेशी वाटत नाहीये.
  • Log in or register to post comments

कस्काय?

दादा कोंडके
Mon, 01/28/2013 - 18:20 नवीन
तूमच्या आयडीला बिलकूल साजेशी वाटत नाहीये.
कसं काय? रचनेच्या सौंदर्याबद्दल दुमत नहिये पण इतर कोणत्याही धाग्यावर प्रतिसाद न देता बक्ककरून कविता टाकणारा आयडी उपटसुंभ का असू नये बरं? उपटसुंभचा दुसरा अर्थ आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

त्याचं काय आहे दादा, आम्ही

उपटसुंभ
Tue, 01/29/2013 - 15:01 नवीन
त्याचं काय आहे दादा, आम्ही वरचेवर हॉटेलात येत नाही. येतो ते असे मधेच आणि काहीबाही टाकून (इथे अर्थ पोस्ट करून, भलता अर्थ नको :)))निघून जातो. नियमीत येणं नसल्यामुळे फारशी ओळखही नाही इथे कुणाशी. त्यामुळे हे सगळं उपटसुंभपणाला साजेसं वर्तन आहे. बाकी माहिती खात्यावर कळेलच..! आता नियमीतपणे येण्याचा प्रयत्न करु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

अतिशय आवडली... प्रतिसादात

इन्दुसुता
Sun, 01/27/2013 - 00:47 नवीन
अतिशय आवडली... प्रतिसादात आणखी लिहिण्यासाठी काळीज जागेवर नाही ...
  • Log in or register to post comments

सुंदर गझल ..

मनीषा
Tue, 01/29/2013 - 07:14 नवीन
सुंदर गझल ..
प्रत्येक शेर सव्वाशेर! अतिशय उत्तम गझल!
+१
  • Log in or register to post comments

सुरेख

हासिनी
Tue, 01/29/2013 - 15:18 नवीन
सुरेख!!
  • Log in or register to post comments

छान

सुमीत भातखंडे
Tue, 03/19/2013 - 11:04 नवीन
अप्रतिम रचना
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा