न मानला धर्म
न मानली जात
धरली फक्त माणुसकीची कास
कारण हीच आहे माझी वाट ...
बेभान उधळणाऱ्या पावसाच्या सरींनी
नभी आकाशाच्या इंद्रधनुष्य उमटते
माय-माउली मातीतून, मादक सुगंध दरवळतो
जणू घेऊनी रूप परिसाचे, सृष्टीचे चराचर उजळिते
इथे नसे कधी दुजाभाव,
न कधी नरपशुंचा भेदभावाचा घाट,
बरसावे आपणही कधीतरी यासवे, हाच मनी ध्यास
कारण हीच आहे माझी वाट ...
करुनी पैशाला श्वास, लाविली संवेदनांची वाट
मारुनी ताव फुशारकीचे, समेटले सोंग सज्जनांचे
घेऊनी शिक्षण इयत्तांचे, कातडे पांघरले माणुसकीचे,
कातड्यालाच या लावावी आग, हाच मनी ठाव,
कारण हीच आहे माझी वाट ...
वाचने
3928
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
कवितेचा आशय चांगला आहे.
यमक ..?
In reply to कवितेचा आशय चांगला आहे. by ज्ञानराम
ठिक आहे.
काय म्हणू मी याला? काय
नेहमीप्रमाणेच जबरा विडंबन
In reply to काय म्हणू मी याला? काय by अत्रुप्त आत्मा
ठिक आहे,मग या पुढे असले फालतू
In reply to नेहमीप्रमाणेच जबरा विडंबन by अमितसांगली
सांगा,सांगा,सांगा... कुणाच्या
In reply to ठिक आहे,मग या पुढे असले फालतू by अत्रुप्त आत्मा
न मानला धर्म न मानली जात धरली
In reply to काय म्हणू मी याला? काय by अत्रुप्त आत्मा
..
आशय चांगला