मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साय

लीलाधर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
साय ताजी ताजी हाय दूधावरची साय, ताजी ताजी हाय दूधावरची साय ! दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ? गोर्‍या गोर्‍या वाहिनीची साईसारखी काया, साईसारखी काया तीची वडरुपी छाया, वडरुपी छायेत करील मातृरुपी माया ! सांग कधी आणतोस अशी वहिनी भाऊराया !! गोर्‍या गोर्‍या वहिनीची वाजत गाजत काढेन वरात, कधी घेउन येशील सांग वहिनीला घरात! वहिनी येता घरी मिळेल ताजी ताजी साय, दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ? ताजी ताजी हाय दूधावरची साय, ताजी ताजी हाय दूधावरची साय ! दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ?

वाचने 54509 वाचनखूण प्रतिक्रिया 151

In reply to by प्रचेतस

मोदक Mon, 08/26/2013 - 18:28
पुनर्वाचनाचा आनंद मिळाला - तुम्हाला तर मुखोद्गत आहे हे काव्य! :D असो, आम्हालाही पुनर्वाचनाचा आनंद मिळाला.

कोमल Tue, 08/27/2013 - 19:08
आँ?? वल्ली ने काढला होय याला वर... तरीच म्हटलं चचा ला कसा वेळ मिळाला हिकड फिरकायला... ;)

नूतन सावंत Sun, 05/10/2015 - 13:50
कविता आणि त्यावरचे एक्से बढकर एक प्रतिसाद वाचून ह.ह.पु.झा.बाकी वडासारखी छाया हवी आहे म्हणून कदाचित वाहिनीच सगळी साय खाउन टाकेल हा धोका आहेच.

सतिश गावडे Sun, 05/10/2015 - 13:59
वाह... साय वर आली. वाचून पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. टागोरांची "गितांजली", हरिवंशराय बच्चन यांची "मधूशाला" आणि लिलाधर यांची "साय" कितीही वेळा वाचले तरी प्रत्येक वेळी नविन वाटतात.

In reply to by सतिश गावडे

बॅटमॅन Mon, 05/11/2015 - 14:14
मोकलाया दाही दिश्या, कस्सा राव थांबू, भांडे का लपविता, इ.इ. महाकाव्यांना तुम्ही कसे विसरू शकता मालक? :(

In reply to by यसवायजी

नाखु Mon, 05/11/2015 - 12:58
पी एस पी ओ नही जानता !!!!!! कस हुणार याचं !! अन्या दातार* बरोबर राहुनही पुरेशी तयारी झाली नाही हे खेदाने सांगावे लागत आहे. अखिल बालक्-पालक्-(चालढकल) शिक्षण सेवा संघातर्फे अ.मि.मां.का.मि.प.तर्फे कोल्हापूर कट्टा हजेरींसाठी प्रकाशीत. *ह्यो कोण याची चवक्शी करू नै.

In reply to by तिमा

नाखु Wed, 05/13/2015 - 11:06
लेखकाने साय लिहून अगोदरच हाय खाल्ली आहे !!!! त्यात तुम्ही सैंय्या म्हटल्याने भैय्या रागवणार नाही याची खात्री देता येत नाही.
कोल्हापूर कट्ट्यामध्ये "साय्"वाचन+ सूड निरूपण प्रत्यक्ष पाहिलेला
अनुभवी नाखु

पैसा गुरुवार, 03/01/2018 - 10:31
सांप्रत कवी आणि त्यांचे दादा दोघेही मिपावरून गायब असतात असे निरीक्षण नोंदवते.

सूड गुरुवार, 03/01/2018 - 14:13
सदाहरित काव्य!! मिपाच्या कलोनियन कजिन्सनी पुन्हा एकत्र यावं आणि सायीनंतर पुढे खवा, कुंदा, गुलाबजाम अशी मालिका चालू ठेवावी.

नाखु गुरुवार, 03/01/2018 - 22:21
नविन फलक प्रभुकी लीला अपरंपार!! लीला की साय अटकेपार !!! अखिल मिपा निवासी अनिवासी अनवट वाटेवरील वाटेवरील कविता वाचनाचा कार्यक्रम सादर करायला हवा रे संघटना सदस्य लोकांना कवींच्या रचना त्यांच्या आवाजात ऐकायला आवडेल अशी यादी सुचवणी द्यावी ही विनंती

अभ्या.. गुरुवार, 03/01/2018 - 23:21
लील्या म्हणजे तोच ना सो साय टी चे संविधान वाटणारा? . . कसं व्हायचं ह्याचं कुणास ठाउक? (च्यायला, मला लै लौकर हा फील यायला सुरुवात झाली ;) )

In reply to by प्रचेतस

आणि ऐतिहासिक सुध्दा, पुढे कधी काळी कोणी जर मिपावर पीएचडी वगेरे केली तर ही कविता ऑप्शनला सोडता येणार नाही. पैजारबुवा,