Skip to main content

साय

लेखक लीलाधर यांनी बुधवार, 12/09/2012 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
साय ताजी ताजी हाय दूधावरची साय, ताजी ताजी हाय दूधावरची साय ! दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ? गोर्‍या गोर्‍या वाहिनीची साईसारखी काया, साईसारखी काया तीची वडरुपी छाया, वडरुपी छायेत करील मातृरुपी माया ! सांग कधी आणतोस अशी वहिनी भाऊराया !! गोर्‍या गोर्‍या वहिनीची वाजत गाजत काढेन वरात, कधी घेउन येशील सांग वहिनीला घरात! वहिनी येता घरी मिळेल ताजी ताजी साय, दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ? ताजी ताजी हाय दूधावरची साय, ताजी ताजी हाय दूधावरची साय ! दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ?
लेखनविषय:

वाचने 54553
प्रतिक्रिया 151

प्रतिक्रिया

गोर्‍या गोर्‍या वाहिनीची साईसारखी काया, साईसारखी काया तीची वडरुपी छाया,
लैच अचाट उडी आहे ही .... वडाच्या झाडाखाली दुध तापवतात काय तुमच्याकडे ? त्याशिवाय असली कल्पना सुचणे म्हणजे अशक्यच.... _/\_

In reply to by प्रसाद गोडबोले

झाडाखाली दुध तापवतात =) =)

किती वेळ झाला ..... मनातल विडंबन काही बाहेर येत नाही ................. वाट पाहतो .......

In reply to by धन्या

@ म्हणजे या कवितेतले दादा तुम्हीच का?>>> तुंम्ही कित्तिही काहिही जरी म्हणलात,तरी..
तो मी नव्हेच!!!
http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

स्पा काकाचे धन्यवाद. वर आणल्याबद्दल. नाहीतर आम्ही कविवर्य लीलाधराच्या ह्या वाडःमयीन कलाकृतीस मुकलो असतो. अवांतरः वहिनी बहूधा वडराची आहे नि तीचे नाव छाया आहे.

ह्या कवितेवर आधारित 'साय'को चित्रपट काढण्याच्या विचारात आहेत काही प्रोड्यूसर्स!

In reply to by प्रचेतस

पुनर्वाचनाचा आनंद मिळाला - तुम्हाला तर मुखोद्गत आहे हे काव्य! :D असो, आम्हालाही पुनर्वाचनाचा आनंद मिळाला.

आँ?? वल्ली ने काढला होय याला वर... तरीच म्हटलं चचा ला कसा वेळ मिळाला हिकड फिरकायला... ;)

कविता आणि प्रतिसाद वाचून हहपुवा!

९७. चचा ला लग्नाचा आहेर करा '१०१' चा. ;)

In reply to by स्पा

किती सहज, सुंदर प्रतिसाद आहे हा... कितीही वेळा वाचला तरी जितका खुला, तितकाच बंद वाटतो!

पुनर्वाचनाचा आनंद मिळाला. :)

कविता आणि त्यावरचे एक्से बढकर एक प्रतिसाद वाचून ह.ह.पु.झा.बाकी वडासारखी छाया हवी आहे म्हणून कदाचित वाहिनीच सगळी साय खाउन टाकेल हा धोका आहेच.

वाह... साय वर आली. वाचून पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. टागोरांची "गितांजली", हरिवंशराय बच्चन यांची "मधूशाला" आणि लिलाधर यांची "साय" कितीही वेळा वाचले तरी प्रत्येक वेळी नविन वाटतात.

In reply to by सतिश गावडे

मोकलाया दाही दिश्या, कस्सा राव थांबू, भांडे का लपविता, इ.इ. महाकाव्यांना तुम्ही कसे विसरू शकता मालक? :(

In reply to by यसवायजी

पी एस पी ओ नही जानता !!!!!! कस हुणार याचं !! अन्या दातार* बरोबर राहुनही पुरेशी तयारी झाली नाही हे खेदाने सांगावे लागत आहे. अखिल बालक्-पालक्-(चालढकल) शिक्षण सेवा संघातर्फे अ.मि.मां.का.मि.प.तर्फे कोल्हापूर कट्टा हजेरींसाठी प्रकाशीत. *ह्यो कोण याची चवक्शी करू नै.

In reply to by तिमा

बायकुका ?? अग्गो बाय बाय . का असं करताय , का का?

In reply to by तिमा

अर्रर्र!! आता स्मायल्यांचा मारा झेलायला तयार राहा काका!! ;)

,साय, खाये सैंया हमारो !

In reply to by तिमा

लेखकाने साय लिहून अगोदरच हाय खाल्ली आहे !!!! त्यात तुम्ही सैंय्या म्हटल्याने भैय्या रागवणार नाही याची खात्री देता येत नाही.
कोल्हापूर कट्ट्यामध्ये "साय्"वाचन+ सूड निरूपण प्रत्यक्ष पाहिलेला
अनुभवी नाखु

बिनधास्त 'साय'लिही गड्या तुला भिती कुणाची 'गणपती'करण्याची रीतच हाय मिपाकरांची स्वतः लिहायला घाबरणारी भिंगरी

:);)

सांप्रत कवी आणि त्यांचे दादा दोघेही मिपावरून गायब असतात असे निरीक्षण नोंदवते.

सदाहरित काव्य!! मिपाच्या कलोनियन कजिन्सनी पुन्हा एकत्र यावं आणि सायीनंतर पुढे खवा, कुंदा, गुलाबजाम अशी मालिका चालू ठेवावी.