लघु वल्गुदभारत-भाग १.
समस्त पंडित कवींचे आभार आणि क्षमा मागून पुढची ही वल्गुद-जिलेबी पाडली ऐसीजे . काही जिलेब्यांचे वरिजिनल मॉडेल मिपाकर नक्कीच वळखू शकतात. नसल्यास परत सांगतो शेवटी . तर या त्या जिलब्या:
असा येतां पाहे निजनिकट तो वल्गुद-हरि |
तदा जोकर् चित्तीं बहुत भरती मोदलहरी |
सुरीतें चाकूतें परजुनि वदे गद्गद रवें |
दिले शत्रू देवें मज सकल लोकांत बरवें ||१||
जिथे नाचती गुंड त्या जोकराचे | जनें होत पिल्लू जणूं कोकराचें |
स्व-कौशल्य ज्या कत्तलींतून नाना | दिसे त्या करोनी करीती तनाना ||२||
असे कर्णिका अंबुजामाजि जेवी | ठगांमध्यभागी बसे ली चि तेवी |
बसे एकला शांत जो चीनदेशी | तया बाहिरी काढणे हो अपेशी ||३||
तरी काढले बाहिरी लीलया हो | पुरी वाल्गुदी दाविली पैं तयां हो |
दिसामाजि ली आणिला गॉथमांते | तसा सोपवीला पहा गॉर्डनांते ||४||
तदितर ठग भेणे वेगळाले पळाले |
बहुत बहुत दंगा जे कराया मिळाले |
स्वठग गवसला जो याजपाशी नसे तो |
कठिण समय येता कोण कामास येतो ||५||
अद्यापि रेचल मनी बहु आठवीते |
संभाषणें निजमना रिझवीत जाते |
गेली परी हृदय नष्टवुनी सदाची |
कैसे जगू, रुचि मनातिल नष्ट साची ||६||
अशी संपली पूर्ण हो अष्ट वर्षें |
रणें माजती गॉथमीं हर्षमर्षें |
तरी वाल्गुदेया स्मरतात काही |
उसासे तरी काढती लोक काही ||७||
(क्रमशः).
मस्त!
धन्यवागदगळु ! आदरे ईसरे
धन्यवादगळु!
माताय...! इथे पण गळुच का?
वाहवा! ये बॅटमॅनका सिक्सर!
लै भारी रे वटवाघुळा . जरी
खरे सत्य त्वां बोलिसी येथ
भुजंगप्रयातस्य मातास्य
ननगे, इदु भाळ शेरत्तदं !
(No subject)
जिलेबी खाऊन जिभेचे तुकडे पडले,,,
जिल्बीची साइज काय आहे रे.
आवडले.
(No subject)
मस्त :)
हाय हाय! हल्ली शरदिनी ताईंची
असा ब्याट-म्यानी लिहू लागला
लई झ्याक लिहिलंय रे.....
एकदम 'कृष्ण योद्धा'ने सुरवात?
पार वल्गुदुन टाकले ! मला तरी
शिर्षासन करुन (मला तरी हे
अच्छा,असं हाय काय !
व्हय व्हय.
वल्गुद त्रिधारा!!! आवडल्या