✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लघु वल्गुदभारत-भाग १.

ब — बॅटमॅन, Sun, 09/09/2012 - 00:48
समस्त पंडित कवींचे आभार आणि क्षमा मागून पुढची ही वल्गुद-जिलेबी पाडली ऐसीजे . काही जिलेब्यांचे वरिजिनल मॉडेल मिपाकर नक्कीच वळखू शकतात. नसल्यास परत सांगतो शेवटी . तर या त्या जिलब्या: असा येतां पाहे निजनिकट तो वल्गुद-हरि | तदा जोकर् चित्तीं बहुत भरती मोदलहरी | सुरीतें चाकूतें परजुनि वदे गद्गद रवें | दिले शत्रू देवें मज सकल लोकांत बरवें ||१|| जिथे नाचती गुंड त्या जोकराचे | जनें होत पिल्लू जणूं कोकराचें | स्व-कौशल्य ज्या कत्तलींतून नाना | दिसे त्या करोनी करीती तनाना ||२|| असे कर्णिका अंबुजामाजि जेवी | ठगांमध्यभागी बसे ली चि तेवी | बसे एकला शांत जो चीनदेशी | तया बाहिरी काढणे हो अपेशी ||३|| तरी काढले बाहिरी लीलया हो | पुरी वाल्गुदी दाविली पैं तयां हो | दिसामाजि ली आणिला गॉथमांते | तसा सोपवीला पहा गॉर्डनांते ||४|| तदितर ठग भेणे वेगळाले पळाले | बहुत बहुत दंगा जे कराया मिळाले | स्वठग गवसला जो याजपाशी नसे तो | कठिण समय येता कोण कामास येतो ||५|| अद्यापि रेचल मनी बहु आठवीते | संभाषणें निजमना रिझवीत जाते | गेली परी हृदय नष्टवुनी सदाची | कैसे जगू, रुचि मनातिल नष्ट साची ||६|| अशी संपली पूर्ण हो अष्ट वर्षें | रणें माजती गॉथमीं हर्षमर्षें | तरी वाल्गुदेया स्मरतात काही | उसासे तरी काढती लोक काही ||७|| (क्रमशः).
  • लघु वाल्गुदभारत- भाग २.
  • लघु वाल्गुदभारत-भाग ३.

Book traversal links for लघु वल्गुदभारत-भाग १.

  • लघु वाल्गुदभारत- भाग २. ›

प्रतिक्रिया द्या
7176 वाचन

💬 प्रतिसाद (24)

मस्त!

पैसा
Sun, 09/09/2012 - 01:13 नवीन
आता त्या क्रमशःमधे आम्हाला लटकत ठेवू नका!
  • Log in or register to post comments

धन्यवागदगळु ! आदरे ईसरे

बॅटमॅन
Sun, 09/09/2012 - 01:17 नवीन
धन्यवागदगळु ! आदरे ईसरे निश्चितवागि बेगने मुगिसतिने , तोंद्रे आगल्ला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

धन्यवादगळु!

पैसा
Sun, 09/09/2012 - 01:22 नवीन
चन्नागिदे. बेगा बरिबेक्का!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

माताय...! इथे पण गळुच का?

प्रचेतस
Sun, 09/09/2012 - 08:40 नवीन
माताय...! इथे पण गळुच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

वाहवा! ये बॅटमॅनका सिक्सर!

अरुण मनोहर
Sun, 09/09/2012 - 04:16 नवीन
वल्गुदी मोहोळे टोचले बॅटमॅने मिपारण्यी राही जरा सावधाने
  • Log in or register to post comments

लै भारी रे वटवाघुळा . जरी

प्रचेतस
Sun, 09/09/2012 - 09:06 नवीन
लै भारी रे वटवाघुळा . जरी जोकराला खंदिती वाल्गुदेय सहर्ष परी अल घुलाचा ना घेतला परामर्श |
  • Log in or register to post comments

खरे सत्य त्वां बोलिसी येथ

बॅटमॅन
Sun, 09/09/2012 - 23:50 नवीन
खरे सत्य त्वां बोलिसी येथ वल्ली ; मरे जोकरू , ना मरे वीषवल्ली; पुढे येक देतोचि प्रीक्वेल साचे; तिथे वर्णितो कांड त्या अल्-घुलाचे. (छायाचमूचा शत्रू) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

भुजंगप्रयातस्य मातास्य

sagarpdy
Mon, 09/10/2012 - 00:16 नवीन
भुजंगप्रयातस्य मातास्य ग्रामे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ननगे, इदु भाळ शेरत्तदं !

सूड
Sun, 09/09/2012 - 09:58 नवीन
ननगे, इदु भाळ शेरत्तदं !
  • Log in or register to post comments

(No subject)

sagarpdy
Sun, 09/09/2012 - 11:10 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

जिलेबी खाऊन जिभेचे तुकडे पडले,,,

ज्ञानराम
Sun, 09/09/2012 - 15:04 नवीन
जिलेबी खाऊन जिभेचे तुकडे पडले <<< :-p
  • Log in or register to post comments

जिल्बीची साइज काय आहे रे.

पिंगू
Sun, 09/09/2012 - 19:21 नवीन
जिल्बीची साइज काय आहे रे. तोंडात घुसतच नाही, तुकडे पाडून खातोय.. ;)
  • Log in or register to post comments

आवडले.

चित्रगुप्त
Sun, 09/09/2012 - 23:05 नवीन
आवडले. (जुन्या काव्यात वरती वृत्त कोणते ते लिहिलेले असायचे, तसे करता आल्यास बघा)
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Mon, 09/10/2012 - 00:17 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त :)

नंदन
Mon, 09/10/2012 - 01:09 नवीन
वल्गुदभारत आवडले. पुढचा भाग बेगिना\बेगने\वेगाने (कोकणी\कन्नड\मराठी) येऊ द्या :)
  • Log in or register to post comments

हाय हाय! हल्ली शरदिनी ताईंची

स्पंदना
Mon, 09/10/2012 - 09:05 नवीन
हाय हाय! हल्ली शरदिनी ताईंची गादी झटक्ल्यावर त्यातन पडल्या सारखी वाटते ही कवीता. पण काही म्हण बॅटमन 'लय हुशार ' बग तू.
  • Log in or register to post comments

असा ब्याट-म्यानी लिहू लागला

अत्रुप्त आत्मा
Mon, 09/10/2012 - 19:12 नवीन
असा ब्याट-म्यानी लिहू लागला हो चरित्रातुनी तो नवा भाग येवो... किती कष्ट हो वाचका अंतरी ते अता लवकरी नवा भाग तू दे.. ;)
  • Log in or register to post comments

लई झ्याक लिहिलंय रे.....

५० फक्त
Mon, 09/10/2012 - 21:03 नवीन
लई झ्याक लिहिलंय रे.....
  • Log in or register to post comments

एकदम 'कृष्ण योद्धा'ने सुरवात?

संपत
Mon, 09/10/2012 - 22:48 नवीन
'इति वाल्गुदेय' कधी येणार? बाल कांड सुरवातीला यायला पाहिजे होते.. कि गतस्मृतींमध्ये येणार.. पण मजा आली.. पु.भा.शु.
  • Log in or register to post comments

पार वल्गुदुन टाकले ! मला तरी

मदनबाण
Tue, 09/11/2012 - 22:09 नवीन
पार वल्गुदुन टाकले ! ;) मला तरी यातले काही घंटा समजले नाही ! शिर्षासन करुन (मला तरी हे झेपणार नाही.;) ) वाचण्याचा प्रयत्न केल्यास बहुधा कळावे यातले काहीतरी असे वाटते. ;)
  • Log in or register to post comments

शिर्षासन करुन (मला तरी हे

प्रचेतस
Tue, 09/11/2012 - 22:44 नवीन
शिर्षासन करुन (मला तरी हे झेपणार नाही.Wink ) वाचण्याचा प्रयत्न केल्यास बहुधा कळावे यातले काहीतरी असे वाटते
त्यानेही काही फरक पडणार नाही. त्यासाठी वाचायला नाही तर वल्गुद त्रिधारा (बॅटमॅन ट्रिलोजी) बघायला लागेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

अच्छा,असं हाय काय !

मदनबाण
Tue, 09/11/2012 - 22:47 नवीन
अच्छा,असं हाय काय ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

व्हय व्हय.

प्रचेतस
Tue, 09/11/2012 - 22:49 नवीन
व्हय व्हय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

वल्गुद त्रिधारा!!! आवडल्या

बॅटमॅन
Wed, 09/12/2012 - 13:44 नवीन
वल्गुद त्रिधारा!!! आवडल्या गेले आहे :) जियो वल्ली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा