मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गुरु...

अत्रुप्त आत्मा · · जे न देखे रवी...
काव्यरस
गुरु रे गुरु तो कसा रे असावा...? न चिडता ओरडता,डबलसीट बसावा पुढुन वहान येता,मागुन बोंब मारावा असा गुरु कमी,मित्र जास्ती असावा धरो कान त्यानी जसा मी चुके रे रडो तो ही जर कान माझा दुखे रे उभयता असे प्रेम नसतो दुरावा डोळे झाकुनी तेथे,प्लस वन भरावा कसे ओळखावे,गुरु श्रेष्ठ आहे जरा मी घसरता,करी तो ही - ह्हे...! ह्हे...! असा दुष्टबुद्धी, गुरुही त्यजावा मनी त्यासी नेहेमी,मायनस वन मोजावा गुरु आत्म ज्ञानी,असो मित्र कोणी जसा आमचा तेंडल्या,किंवा कॅप्टन धोणी बघोनी शिकावा,शिकोनी बघावा असा गुरू नेहेमी,हातचा एक धरावा कधी तो ही मारे,किती ऊंच शॉटं कधी शिष्य घेई,तयाचाच कॉटं तरी तो गुरु,नाही कणभर चिडावा खर्‍या गुरूचा,हाच अस्सल पुरावा..! मिळाला मिळाला गुरु तो मिळाला परंपरेत सार्‍या,होता जो तळाला तयाच्याच रूपी,जणू मित्र आहे मनीचेच माझ्या,खरे चित्र आहे. ०===०===०===०===०===००===०===०===०===०===००===०===०===०===०===००===०===०===०===०===०

वाचन 3470 प्रतिक्रिया 0