Skip to main content

निसर्गकविता ४: पाऊस

लेखक गणेशा
सोमवार, 11/06/2012 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गकविता १ : झाडांच्या पानात (With Mp3 song) - http://www.misalpav.com/node/20633 निसर्गकविता २ : प्रिय प्राजक्त - http://www.misalpav.com/node/20703 निसर्गकविता ३: कोसळल्या सरी.. दूर डोंगरमाथी... http://www.misalpav.com/node/21061
अलवार सर पावसाची वार्‍यासंगे बिलगती नाजुक कोरीव पात्यांवर घन कोवळे ओथंबती पवना माय खळाळती फुललेल्या घरभिंती हळुवार टपोर्‍या थेंबांची किनार्‍यावर गस्त चालती ओल्या-हिरव्या रस्त्यांवरती पाऊले रिमझीम पडती गंधाळलेल्या मातीमधुनी प्रेमाची पाखरण होती दूर विंचुकाट्यावरी ओलेती नजर विसावती ओघळलेल्या स्वप्नचांदण्यास मन अलगद वेचती -- शब्दमेघ (निसर्गकविता : १० जून २०१२)
लेखनविषय:

वाचने 1607
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

पवना माय खळाळती फुललेल्या घरभिंती हळुवार टपोर्‍या थेंबांची किनार्‍यावर गस्त चालती
व्वाह!! मस्तचं.. आवडली.