Skip to main content

निसर्गकविता ४: पाऊस

लेखक गणेशा यांनी सोमवार, 11/06/2012 17:22 या दिवशी प्रकाशित केले.

निसर्गकविता १ : झाडांच्या पानात (With Mp3 song) - https://www.misalpav.com/node/20633
निसर्गकविता २ : प्रिय प्राजक्त - https://www.misalpav.com/node/20703
निसर्गकविता ३: कोसळल्या सरी.. दूर डोंगरमाथी... https://www.misalpav.com/node/21061


अलवार सर पावसाची
वार्‍यासंगे बिलगती
नाजुक कोरीव पात्यांवर
घन कोवळे ओथंबती

पवना माय खळाळती
फुललेल्या घरभिंती
हळुवार टपोर्‍या थेंबांची
किनार्‍यावर गस्त चालती

ओल्या-हिरव्या रस्त्यांवरती
पाऊले रिमझीम पडती
गंधाळलेल्या मातीमधुनी
प्रेमाची पाखरण होती

दूर विंचुकाट्यावरी
ओलेती नजर विसावती
ओघळलेल्या स्वप्नचांदण्यास
मन अलगद वेचती

-- शब्दमेघ (निसर्गकविता : १० जून २०१२)

लेखनविषय:

वाचने 1625
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

पवना माय खळाळती
फुललेल्या घरभिंती
हळुवार टपोर्‍या थेंबांची
किनार्‍यावर गस्त चालती

व्वाह!! मस्तचं..
आवडली.