पालखी काळाची थांबली एकदा,
बदलण्या खांदा भोईयांचा |
त्याच क्षणी माझ्या-समोर ती होती,
पेटवून ज्योती, अंतरात |
पालखी काळाची गेली निघोनिया,
ज्योत ठेवोनिया तेवतीच |
आता वाट आहे पहायाची फक्त,
'क्षणा'तून मुक्त होण्यासाठी |
-चैतन्य
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
काव्यप्रेमी,
वृत्त गंडले नाही.
६,६,६,४ असं अभंगाचं वृत्त आहे.
त्याच क्षणी माझ्या (६) समोर ती होती (६)
पेटवून ज्योती (६) अंतरात (४)
(माझ्यासमोर हा एकच शब्द आहे, पण वृत्ताच्या हिशोबाने माझ्या-समोर असा लिहिला आहे)
धन्यवाद,
चैतन्य.
छान
:)
व्वाह,,,व्वा..व्वा... मित्रा
खूपच छान आहे.
वाह खूपच सुंदर !!
क्या बात है!!
धन्यवाद
आता वाट आहे पहायाची फक्त,
वाह..