Skip to main content

पालखी

लेखक चैतन्य दीक्षित यांनी मंगळवार, 06/03/2012 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
पालखी काळाची थांबली एकदा, बदलण्या खांदा भोईयांचा | त्याच क्षणी माझ्या-समोर ती होती, पेटवून ज्योती, अंतरात | पालखी काळाची गेली निघोनिया, ज्योत ठेवोनिया तेवतीच | आता वाट आहे पहायाची फक्त, 'क्षणा'तून मुक्त होण्यासाठी | -चैतन्य
लेखनविषय:

वाचने 2643
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

रचना छान झाली आहे.
त्याच क्षणी माझ्या-समोर ती होती, पेटवून ज्योती, अंतरात |
इथे वृत्त गंडले आहे काय?

मस्त लिहिलं आहेस.. क्लास! :) स्वगतः स्साला हा चैतन्य मधूनच असलं भारी लिहून जातो ना की ज्याचं नाव ते.. राघव

व्वाह,,,व्वा..व्वा... मित्रा ,थोडकेच पण काय समर्पक काव्य लिहिलयस रे... सलाम सलाम सलाम आपला तुला

कविता खूप आवडली. छोटसच विरहगीत पण मनाला स्पर्श करून गेलं --------------------------------------------------------------------------------------------

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. काव्यप्रेमी, वृत्त गंडले नाही. ६,६,६,४ असं अभंगाचं वृत्त आहे. त्याच क्षणी माझ्या (६) समोर ती होती (६) पेटवून ज्योती (६) अंतरात (४) (माझ्यासमोर हा एकच शब्द आहे, पण वृत्ताच्या हिशोबाने माझ्या-समोर असा लिहिला आहे) धन्यवाद, चैतन्य.

आता वाट आहे पहायाची फक्त, 'क्षणा'तून मुक्त होण्यासाठी |
अप्रतिम ! 'काही निमित्ताने' आज बरेच दिवसांन्नी ही कविता आठवली म्हणुन धागा वर काढत आहे :)

वाह.. धन्स रे प्रगो हि कविता वर काढल्याबद्दल !