Skip to main content

सरळ रस्ता

लेखक मयुरपिंपळे यांनी सोमवार, 30/01/2012 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
जीवन म्हणजे एक सरळ रस्ता किती तरी होतात मनाला खस्ता | आनंदाला हि नाही कुठं कट्टा दुःखांनी सुधा मांडला सर्वी कडे सट्टा | रात्र व दिवस ह्यांचा नुसता पोर खेळ ह्यामध्ये सावलीचा ही कुठं नाही बसत मेळ | नाला, नद्यांनी बदलला मार्ग पण रस्ता मात्र सरळ| -- मयुर (नवकवी)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 10628
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

In reply to by पक पक पक

स्व'देशी चा मार्ग अवलंबा ,सर्व रस्ते अगदी तुम्हाला हवे तसे वेडे वाकडे होतिल .....
ह्म्म

एक लडकी भिगी भागी माझं नाव लंगडा त्यागी ;-) मला का मिळत नाही या जगी..? मी रडलो तर म्हणतात उगी..उगी..! चचा---येशील कधी परतुन..? इतक्या जिलब्या पचत नाहीत रे एकट्याला ... हं.... व्यर्थ हे जिवन>>>> हां सुचलं सुचलं--- व्यर्थं हे माझे जिवन तो सिनेमातला जी-१ खायला ग्येलो मी जिलब्या पण तोंडात पडला घावन ... ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

चचा---येशील कधी परतुन..? इतक्या जिलब्या पचत नाहीत रे एकट्याला ...
चचा येणार नाही इतक्यात परतून, मिपा ब्लॉकलंय त्याच्या हापिसातून, टाकुनी मिपावर इतक्या जिलब्या, हापिसात झाल्यात भलत्याच बोंबा.

कविता म्हणजे फकस्त दोन ओळीमधले यमक प्राची ला गच्ची जोडणे हेच तिचे गमक नवकवीना घाबरून आज ओस पडला कट्टा कवितेची चारचौघात तरी थाम्बली आहे थट्टा शब्द आणि यमके यान्चा नुसता पोर खेळ भाव आणि आशयाचा मात्र कुठे न बसे मेळ काव्य चारोळ्यान्चा कविराज सोडा वाममार्ग, गद्याचे पकडा विमान! -- मूकवाचक (गद्यकवि)

In reply to by मूकवाचक

जीवन म्हणजे एक सरळ रस्ता किती तरी होतात मनाला खस्ता |
जेवण म्हणजे एक भरलेलं ताट बसायच्या आधी घेतात पाणी अन् पाट :P

In reply to by प्रचेतस

@जेवण म्हणजे एक भरलेलं ताट बसायच्या आधी घेतात पाणी अन् पाट मेलो....मेलो...अगागागागागा...वल्लीदा...ठ्ठार जाहलो...निर्वाण निर्वाण निर्वाण पावलो.. वल्लीदांनी फोडिला नवकवीपणाचा माठ नवकविंनो सांभाळून...आहे वल्लीदांशी गाठ अवांतरः-येऊ द्या अता अश्याच प्रतिक्रीया भरमसाठ

In reply to by प्रचेतस

ठार जाहलो वल्लीसाहेब! फुटलो! ही घ्या... भरुदे नवकवितांचा माठ करुदे त्यांनाही मान ताठ येउदे परत त्यावर विडंबनाची लाट काव्यरसाची लागेना का वाट!! ;)

In reply to by मोहनराव

यावर उत्तर म्हणुन मला एक कविता लिहावी वाटत आहे... @ क्या बैठी है वल्ली की शॉट, नवकवि की लगगयी है वाट, और खडी होगयी है खाट, सगळे पळ रहे है सुसाट !!

In reply to by मयुरपिंपळे

कृपया नवी कवीची थट्टा करु नये
नवी कवीची का नव कवीची?

In reply to by मयुरपिंपळे

ओले बाळा, कोणीही थट्टा करत नाहीये! फक्त लवकर मोठा हो म्हणुन गोंजारत आहेत, हो किनै ओ वल्ली?

In reply to by मोहनराव

थट्टा कोण कशाला करील उगाच. नवकवींची नवोन्मेषी नवप्रतिभा जागृत व्हायलाच हवी.

जीवन म्हणजे एक खारा पिस्ता परवडत नाही म्हणून होतात मनाला खस्ता | आमच्या कवितांना नाही कुठं कट्टा जिलब्या पाडतोय.. करा चट्टा मट्टा | शब्द आणि यमक ह्यांचा नुसता पोर खेळ ह्यामध्ये अर्थाचा कुठंही बसत नाही मेळ | नव्या , जुन्या मेम्ब्रांनी घेतले नव वळण पण "मिपा " मात्र अजूनही नेहमीसारखेच सरळ|

In reply to by प्रचेतस

आभारी आहे आपला ....
नवकवींना नाउमेद करणार्‍या प्रवृत्तींचा जाहिर निषेध.

In reply to by मयुरपिंपळे

@ मयुरपिंपळे तुम्ही सिरियस नका होउ लगेच ,मि पा कराची सवय आहे ही ;) तुम्ही छान छान कविता करा, छान छान प्रतिसाद आपोआप मिळ्तील :)

In reply to by पियुशा

गोग्गोड बोलुन आपल्या धाग्यावरचे प्रतिसाद वाढवण्याचा अतिशय हि&ही प्रयत्न...

In reply to by पियुशा

मिपा काराची सवय महित आहे आणी काहि मिपा सदस्य हे चांगलेच परीचयाचे आहेत.

In reply to by मयुरपिंपळे

काय माहीत मिपाकर आता लिहुन देतील की नाही
अहो अजिबात असं नाही.. उलट तुमच्याकडून याहून अधिक चांगलं लिहून होईल आणि नेहमीच अधिकाधिक चांगलं लिहिलं जाईल अशी याची काळजी घेतील सगळे.. आनंदाला कट्टा राहिला नाही काय म्हणताय हो कवितेत? मिपा हा आनंदाचाच कट्टा आहे.. वर्षभराहून अधिक इथे येत असूनही तुम्हाला तो गावला कसा नाही??

In reply to by मयुरपिंपळे

काय माहीत मिपाकर आता लिहुन देतील की नाही
मिपाकरांना असे हसत खेळत खट्याळपणाने प्रतिसाद देण्याची सवयच आहे. असे पण मिपाकर हे कसलेले शिल्पकार आहेत हो या बाबतीत, तुम्हाला बी-घडण्यासाठी ते शाब्दीक ठोके टाकतीलही प्रसंगी तुमच्यावर पण त्यातून तुमची अधिकाधिक सुंदर मुर्ती घडावी असाच हेतू त्यांचा असतो. राग मानू नका आणि आपले लिखाण मिपावर टाकत चला! पु.ले.शु. :)

In reply to by अन्नू

@मयूर पिंपळे अस्सं नाय कराच्च.. तुम्ही आत्ता नदीच्या अलीकडे आहात.. पलीकडे यायला पोहावं लागणारच :) पु.ले.शु. (नदीच्या पुलावरुन मजा बघणारा)

जीवन म्हणजे एक बारकं लाटणं पाठीत बसेल असं सारखं वाटणं वाटण वाटणं म्हणजेही नुसते हाल अहो आणखी किती मटण खाल? भारतीय स्त्रीच्या मनाचा अन जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न..

@जीवन म्हणजे एक बारकं लाटणं पाठीत बसेल असं सारखं वाटणं वाटण वाटणं म्हणजेही नुसते हाल अहो आणखी किती मटण खाल? अरे बास रे बास...! अता हसून हसून मारायची पाळी येणारे...

लग्न म्हणजे आहे एक शिरस्ता त्यासाठी तुम्ही फाडलाय का बस्ता आनंदाला इथे कुठेही नाही तोटा नातेवाईकांनी मांडलीय पुरेपूर थट्टा रात्र व दिवस ह्यांचा नुसता पोर खेळ नवरी म्हणे नवर्याला लागतोय का इतका वेळ गाद्या गिरद्यांनी बदलला रस्ता पण नवरा मात्र सरळ (आंबट चवी )