✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

विधिलेशा

अ — अज्ञातकुल, Mon, 12/26/2011 - 09:04
जळली तृणके गिरी बोडके वणवा बिन बोभाटा कशाच उरल्या तशाच अजुनी पायखुणांच्या वाटा काजळ तनभर माळशिरावर त्यात विखुरलेल्या लाटा पोत धुळीचे अधिक उजळले शेष न एकहि काटा या वळणावर उभा एक मी निरखित लामण रेषा काळावरती उठून दिसल्या विरलेल्या विधिलेशा .......................अज्ञात

प्रतिक्रिया द्या
1324 वाचन

💬 प्रतिसाद (5)

व्वा व्वा अज्ञातजी

लीलाधर
Mon, 12/26/2011 - 09:09 नवीन
फारच छान सुंदर या वळणावर उभा एक मी निरखित लामण रेषा काळावरती उठून दिसल्या विरलेल्या विधिलेशा अप्रतिम
  • Log in or register to post comments

विं.दा करंदिकर आठवले , खुप

पक पक पक
Mon, 12/26/2011 - 13:02 नवीन
विं.दा करंदिकर आठवले , खुप सुंदर लिहीले आहे.....
  • Log in or register to post comments

नेहमी प्रमाणेच उत्तम कविता.

इन्दुसुता
Mon, 12/26/2011 - 19:57 नवीन
नेहमी प्रमाणेच उत्तम कविता. खूप आवडली. येथे कवी, या वळणावर ; गत जीवनाकडे मागे वळून बघतो आहे की पुढे असलेल्या , असा प्रश्न पडला.
  • Log in or register to post comments

उत्तम

तिमा
Mon, 12/26/2011 - 20:07 नवीन
काव्य उत्तम प्रतीचे आहे. तुमच्या दर्जाला अभिवादन.
  • Log in or register to post comments

सर्वांचे आभार आणि नवीन

अज्ञातकुल
Mon, 01/02/2012 - 09:51 नवीन
सर्वांचे आभार आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा :-)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा