✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एकदा वाटलं कविता करावी...

प — प्यारे१, गुरुवार, 12/01/2011 - 12:33
एकदा वाटलं कविता करावी... सोप्पं तर असतं.. 'र' ला 'र' आणी 'ट' ला 'ट', त्यात काय एवढं... जमेल की आपल्यालाही एवढे काय आपण 'हे' आहोत... थोडे छान, थोडे दुर्बोध, थोड रुपकात्मक,थोडे तरल, काही मात्र अगदीच वास्तव लिहू आपण चार शब्द... मात्रा देखील जमतीलच की, वृत्त थोडी अडखळ्तील ही, कवयत्रिचे देउन नाव, निभावून ही जाईलच की... मग वाटले नको असे, मग वाटले नकोच ते, मिळेल फटका, होईलही कौतुक, पण कशाला हवे जोडायला आपलं पोतेरं कवितांच्या मलमली गालिच्यांना..... ( इतरत्र पूर्वप्रकाशित)

प्रतिक्रिया द्या
3080 वाचन

💬 प्रतिसाद (16)

झकास.....

स्पा
गुरुवार, 12/01/2011 - 12:54 नवीन
पण कशाला हवे जोडायला आपलं पोतेरं कवितांच्या मलमली गालिच्यांना..... सहिच
  • Log in or register to post comments

प्यारे, झकास रे एकदम. शेवटी

प्रचेतस
गुरुवार, 12/01/2011 - 12:54 नवीन
प्यारे, झकास रे एकदम. शेवटी तूही कविता प्रसवलीसच. :)
  • Log in or register to post comments

मस्त.... सध्या मिपावर

सुहास झेले
गुरुवार, 12/01/2011 - 12:57 नवीन
मस्त.... सध्या मिपावर कवितांचा पाऊस पडतोय .... :) :)
  • Log in or register to post comments

प्यारेभौ

अन्या दातार
गुरुवार, 12/01/2011 - 13:17 नवीन
अजुन येऊदेत.
  • Log in or register to post comments

मात्रा देखील जमतीलच की, वृत्त

गणपा
गुरुवार, 12/01/2011 - 13:28 नवीन
मात्रा देखील जमतीलच की, वृत्त थोडी अडखळ्तील ही, कवयत्रिचे देउन नाव, निभावून ही जाईलच की...
अभ्यास दांडगा दिसतोय. ;)
  • Log in or register to post comments

हम्म!

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 12/01/2011 - 13:48 नवीन
आजकाल प्यारे पण कविता करायला लागला तर!! असो. ;)
  • Log in or register to post comments

एकदा वाटलं

आत्मशून्य
गुरुवार, 12/01/2011 - 13:50 नवीन
इथं प्रतिसादच लिहायला नको, सोपाच तर असतो, कोणीही देतो 'फ' ला 'फ' आणी 'फ' ला 'फ', त्यात काय एवढं... देइलच की कोणिही तसेही आपण सगळे 'हे'च आहोत... मग वाटले नको असे, मग वाटले करू तसे, देऊया का फटका ? नको.... त्यापेक्शा करूया कौतुक... मस्त कवीता हो प्यारे१
  • Log in or register to post comments

प्यारे तुम्ही पण ? कविता छान

पियुशा
गुरुवार, 12/01/2011 - 14:30 नवीन
प्यारे तुम्ही पण ? कविता छान ,खासकरुन शेवट्च कड्व :)
  • Log in or register to post comments

मस्त!

मेघवेडा
गुरुवार, 12/01/2011 - 14:48 नवीन
मस्त! अत्यंत वास्तववादी! :)
पण कशाला हवे जोडायला आपलं पोतेरं कवितांच्या मलमली गालिच्यांना.....
आज स्वतःला कवी म्हणवून घेणार्‍यांपैकी ८०% लोकांनी असा विचार करून आपलं काव्यमक्षिकाप्रजनन थांबवण्याचं ठरवलं तर मराठी साहित्याचं भविष्य आणखी उज्ज्वल होईल!
  • Log in or register to post comments

प्यारे लगे रहो.....

वपाडाव
गुरुवार, 12/01/2011 - 18:16 नवीन
आज स्वतःला कवी म्हणवून घेणार्‍यांपैकी ८०% लोकांनी असा विचार करून आपलं काव्यमक्षिकाप्रजनन थांबवण्याचं ठरवलं तर मराठी साहित्याचं भविष्य आणखी उज्ज्वल होईल!
एकदम पर्सनली घेउन एकही कविता न प्रसवण्याचा निर्णय घेतला गेला आहे......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

हा हा हा हा हा पेटलेत आज

सुहास..
गुरुवार, 12/01/2011 - 15:33 नवीन
हा हा हा हा हा पेटलेत आज सगळे !
  • Log in or register to post comments

प्रयत्न छान छान पण हे ही वाचलंत का ?

वाहीदा
गुरुवार, 12/01/2011 - 15:43 नवीन
अरे हे पण वाचलेस का http://www.misalpav.com/node/8987 आपल्या मिपाच्या शाहरुख ने लिहीलेले काव्य .. तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !! -- कवी शाहरुख कोनी 'ट' ला 'ट' आनि 'क्ष' ला 'क्ष' जुळिवतंय आनी पब्लिक त्ये आगदी आतून आलंय म्हनतंय आमानी नाय कवा काय आतून आल्यागत वाटनांर तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !! लोकं लिवत्यात कोड्यात अन गाव म्हनतंय भारी आमी मात्र मनात म्हनतुंय हाय काय ही भानगड तिच्यामारी असली आमची भाषा गावंढळ तरी शिंपल शिंपल लिवनार तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !! परत्येक वळीतला काना मात्रा उकार येलांट्या मोजत्यात आनी साळंतल्या बीजगनितावानी बेरीज वजाबाकी करत्यात आसलं काय गनित आमी नाय मांडनार तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !! निम्म्यांच्या कवितेत असत्यात पानं फुलं फळं अन पक्षी आनी राहिलेल्यास्नी दिसतिया ढगांमदी नक्षी चंद्र सूर्य तारे नदी शेप्रेट फ्रेममदी ठेवनार तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !! हाय काय आनी नाय काय म्हननार आनी तिच्यायला आमीबी येक कविता करनार !! -- कवी शाहरुख
  • Log in or register to post comments

ब्येस हाय! वर आणतोच!

मेघवेडा
गुरुवार, 12/01/2011 - 15:54 नवीन
ब्येस हाय! वर आणतोच! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

खरंतर वपु म्हणालेत तसं

प्यारे१
गुरुवार, 12/01/2011 - 16:48 नवीन
खरंतर वपु म्हणालेत तसं दासबोधानंतर कुणी काही लिहायची गरजच नव्हती. प्रचंड प्रतिभावान अनेकानेक कवी आजूबाजूला असताना आणि भूतकाळात होऊन गेलेले असताना उगाच आपल्या खा*पायी खरेच कविता 'पाडत' असतात. (खर्‍या चांगल्या कवी आणि लेखकुंनी ह घ्या ;) ) बाथरुम सिंगर्सनी मी पहा कशी रफी सारखी तान घेऊ शकतो असे म्हणण्यासारखे काहीसे आहे. मार्च २०१० मध्ये अशाच शेजारच्यांच्या कवनकळांमुळं प्रसूत झालेली ही सिझर्ड कविता आहे. http://www.mimarathi.net/node/941 मिपावरच्या भाद्रपद महिन्याच्या (सौजन्य धमु) उन्नतीकाळात आज हे संदर्भ तितकेच लागू पडतात म्हणून इकडं प्रकाशित करावीशी वाटली. सूज्ञांस अधिक सांगणे न लगे.
  • Log in or register to post comments

हाहाहा!

पैसा
गुरुवार, 12/01/2011 - 19:21 नवीन
प्यारे पण कविता करायला लागला!!! प्रेरणाच भारी आहे.
  • Log in or register to post comments

मस्त !

विदेश
गुरुवार, 12/01/2011 - 21:49 नवीन
एकदा तरी कविता करावी वाटली - वाचावीही वाटली, यातच सारे आले .
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा