एकदा वाटलं कविता करावी...
सोप्पं तर असतं..
'र' ला 'र' आणी 'ट' ला 'ट',
त्यात काय एवढं...
जमेल की आपल्यालाही
एवढे काय आपण 'हे' आहोत...
थोडे छान, थोडे दुर्बोध,
थोड रुपकात्मक,थोडे तरल,
काही मात्र अगदीच वास्तव
लिहू आपण चार शब्द...
मात्रा देखील जमतीलच की,
वृत्त थोडी अडखळ्तील ही,
कवयत्रिचे देउन नाव,
निभावून ही जाईलच की...
मग वाटले नको असे,
मग वाटले नकोच ते,
मिळेल फटका, होईलही कौतुक,
पण कशाला हवे जोडायला
आपलं पोतेरं कवितांच्या मलमली गालिच्यांना.....
( इतरत्र पूर्वप्रकाशित)
काव्यरस
वाचने
3094
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
झकास.....
प्यारे, झकास रे एकदम. शेवटी
मस्त.... सध्या मिपावर
प्यारेभौ
मात्रा देखील जमतीलच की, वृत्त
हम्म!
एकदा वाटलं
प्यारे तुम्ही पण ? कविता छान
मस्त!
प्यारे लगे रहो.....
In reply to मस्त! by मेघवेडा
हा हा हा हा हा पेटलेत आज
प्रयत्न छान छान पण हे ही वाचलंत का ?
ब्येस हाय! वर आणतोच!
In reply to प्रयत्न छान छान पण हे ही वाचलंत का ? by वाहीदा
खरंतर वपु म्हणालेत तसं
हाहाहा!
मस्त !