Skip to main content

ती वाट

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 08/11/2011 या दिवशी प्रकाशित केले.
ती वाट गोकुळातून कुंजवनाकडे जाणारी आजही ती त्याच वाटेवर प्रतीक्षा करतेय कदाचित, तिचा प्राणसखा कधीतरी अवतरेल कुंजवनातील राधिकेला भेटायला आलाच तर तिचेही भाग्य उजळेल . त्याच्या पाऊलखुणांचा वेध घेत धूळभरल्या वाटेवर अजूनही त्या स्पष्ट होत्या पण फक्त आत जाणार्‍या बाहेर येणार्‍या काहीश्या विरळ झालेल्या . त्या कुंजवनातील तो डेरेदार कदंब अजूनही, चमचमत आहे त्या चांद्रवैभवाने त्याच्या पानापानात ते मंतरल्या मुरलीचे भारलेले स्वर अजूनही दाटून आहेत तिला तो कदंब दिसतोय, पण देवकीनंदन, तो नाही तिथे..... . क्षणभर डोळ्यांसमोर रासक्रिडेत दंग गोपीका अन्, गोपीकांमध्ये उजळून दिसणारी ती अल्लड राधिका मधोमध उभा, मुरलीमध्ये प्राण फुंकणारा तो गोपाळ तो का नाही दिसत? . एक कळ खोलवर रुतली एकतारी सणाणून झंकारली स्वर उमटले "मीरा के प्रभू गिरीधर नागर" |- मिसळलेला काव्यप्रेमी -| ०८|११|२०११
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2039
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

छान आहे कविता....!!

वाट पाह्णार्‍या गोपीचे भाव कवितेतून जाणवले . कविता छान आहे .

छान लिहिले आहे एक कळ खोलवर रुतली एकतारी सणाणून झंकारली स्वर उमटले "मीरा के प्रभू गिरीधर नागर" सुंदर पु.ले.शु.

छान लिहिले आहे एक कळ खोलवर रुतली एकतारी सणाणून झंकारली स्वर उमटले "मीरा के प्रभू गिरीधर नागर" सुंदर पु.ले.शु.