ती वाट
ती वाट
गोकुळातून कुंजवनाकडे जाणारी
आजही ती त्याच वाटेवर प्रतीक्षा करतेय
कदाचित, तिचा प्राणसखा कधीतरी अवतरेल
कुंजवनातील राधिकेला भेटायला आलाच तर
तिचेही भाग्य उजळेल
.
त्याच्या पाऊलखुणांचा वेध घेत
धूळभरल्या वाटेवर अजूनही त्या स्पष्ट होत्या
पण फक्त आत जाणार्या
बाहेर येणार्या काहीश्या विरळ झालेल्या
.
त्या कुंजवनातील तो डेरेदार कदंब
अजूनही, चमचमत आहे त्या चांद्रवैभवाने
त्याच्या पानापानात ते
मंतरल्या मुरलीचे भारलेले स्वर
अजूनही दाटून आहेत
तिला तो कदंब दिसतोय, पण देवकीनंदन, तो नाही तिथे.....
.
क्षणभर डोळ्यांसमोर रासक्रिडेत दंग गोपीका
अन्, गोपीकांमध्ये उजळून दिसणारी ती अल्लड राधिका
मधोमध उभा, मुरलीमध्ये प्राण फुंकणारा
तो गोपाळ
तो का नाही दिसत?
.
एक कळ खोलवर रुतली
एकतारी सणाणून झंकारली
स्वर उमटले
"मीरा के प्रभू गिरीधर नागर"
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
०८|११|२०११
वाचने
2039
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
छान ..
वाट -
In reply to वाट - by विदेश
गोपीचे की मीरेचे?
(No subject)
छान कविता
छान...
छान लिहिले आहे एक कळ खोलवर
छान लिहिले आहे एक कळ खोलवर